आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी उद्योजकांचे ग्लोबलायझेशनसाठी, उद्योगबोध : 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किर्लोस्कर, दांडेकर, पेंढारकर, गरवारे अशा नावांपुढे मराठी जनांची औद्योगिक गाडी पुढे जातच नव्हती. त्यात ही मंडळी प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रातील होती. सेवा क्षेत्र १९९१ च्या उदारीकरणानंतर झपाट्याने वाढत होतं.
या क्षेत्रातील मराठी टक्का हळूहळू वाढत होता. हे चित्र बदलण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी एका व्यक्तीने प्रयत्न केला आणि त्यातून उदयास आली एक असामान्य संस्था. ती व्यक्ती म्हणजे इंजिनिअर माधवराव भिडे आणि त्यांनी उभारलेली ही संस्था म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट होय.
त्र मराठी तरुण उद्योगधंद्यात स्थिरावण्याचे श्रेय सॅटर्डे क्लबला : आज मराठी तरुण उद्योग धंद्यात स्थिरावलाय याचं बहुतांश श्रेय हे सॅटर्डे क्लबला जातं. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही संस्था ह्यना नफा ना तोटाह्ण या तत्त्वावर चालते. काही मोजक्या व्यावसायिकांनी मिळून तयार झालेल्या सॅटर्डे क्लबचे आज हजारो सदस्य महाराष्ट्रासह जगभरात कार्यरत आहेत. मुंबईसह पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, सातारा, सांगली, कोल्हापूर ते अगदी दुबई, अमेरिका, सिडनी, हॉंगकॉंग, लंडन येथपर्यंत सॅटर्डे क्लबचं हे जाळं पसरलेलं आहे.
औरंगाबादच्या श्रीकांत शेळकेंचा ट्रस्टच्या माध्यमातून २०० कोटींचा व्यवसाय, ५०० कोटींचे उद्दिष्ट : नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद, अकोला, नागपूर अशा उत्तर महाराष्ट्र- खानदेश-मराठवाडा-विदर्भ आदी विभागात मराठी उद्योजकांचा टक्का विस्तारत आहे. त्यांना एका सूत्रात बांधण्याचं महत्कार्य सॅटर्डे क्लबने केलं. श्रीकांत शेळकेंसारखा तरुण उद्योजक माऊली मेटल इंडिया प्रा. लि या आपल्या कंपनीच्या माध्यमातून वाहन उद्योग, इलेक्ट्रिक इंडस्ट्रीज, किचन अप्लायन्स आदी उद्योगांना ऍल्युमिनियम अलाइज आणि डाय कास्टिंग पुरवितो. औरंगाबादमध्ये राहून २०० कोटी रुपयांचा व्यवसाय करतो आणि आगामी वर्षांत ५०० कोटी रुपयांच्या उलाढालींचं उद्दीष्ट ठेवतो हे कोणत्याही मराठी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. अशा तरुण उद्योजकांची यशोगाथा सॅटर्डे क्लबने जगभर नेण्याचा विडा उचलला आहे.

एकमेका साह्य करू अवघे होऊ श्रीमंत' सॅटर्डे क्लबच्या या घोषवाक्याप्रमाणे उक्तीही, उद्योजक परिषदांचे आयोजन :सॅटर्डे क्लबची जळगाव, औरंगाबाद, नाशिक शाखा फार जोमाने कार्य करीत असून येथील सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योजकांसाठी जणू आधारस्तंभच बनली आहे. या परिसरात उद्योजकविकासासाठी संस्थेने काही उपक्रमही राबविलेत. काही कार्यक्रमही आयोजित केले होते. २०१३ मध्ये जळगाव येथे उद्योगभरारी तर २०१४च्या ऑगस्टमध्ये औरंगाबादेत उद्योगक्रांती आदी उद्योजक परिषदांचे आयोजन केले गेले होते. एकमेकां सहाय्य करु अवघे होऊ श्रीमंतह्ण सॅटर्डे क्लबचे हे घोषवाक्य ही मंडळी अक्षरश: जगत आहेत. म्हणूनच कालपरवापर्यंत हजार-लाख रुपयांची भाषा करणारे मराठी उद्योजक आज कोटींची उड्डाणे सहज करु लागले आहेत.
त्रदुबईच्या राजांचाही हावरेंबरोबर भागीदारीत व्यवसाय : आयफ्लेक्स आणि त्यानंतर जेनकोव्हलच्या माध्यमांतून मराठी झेंडा अटकेपार फडकविणारे दीपक घैसास, रिअल इस्टेट्मध्ये स्वत:चा ठसा उमटविणारे सुरेश हावरे, दुबईच्या राजाला देखील ज्यांच्यासोबत भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याची भुरळ पडली असे मसाला किंग जय दातार यांसारखे जगदविख्यात उद्योजक सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या विविध उपक्रमात सहभागी होतात. प्रत्येक भारतीय माणसाच्या घराघरांत पोहोचलेल्या पितांबरीचे रविन्द्र प्रभुदेसाई, रिअल इस्टेटमध्ये स्वत:चं साम्राज्य निर्माण केलेले डॉ. अजित मराठे, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचे माजी कार्यकारी संचालक अशोक दुगाडे, विनकोट कलर्सचे प्रदीप ताम्हाणे आदी मान्यवर संस्थेच्या विश्वस्तपदी आहेत. तसेच जळगावसारख्या छोट्या शहरातून सुरुवात करुन आज इलेक्ट्रॉनिक उत्पादनांत स्वत:चा ब्रँड प्रस्थापित करणारे छबी इलेक्ट्रिकल्सचे छबिराज राणे हे सचिवपदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. सर्व सदस्य सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टला जनसंपर्काच्या माध्यमातून औद्योगिक जगताशी उद्योगी मराठीजनांना कनेक्ट करीत असतात.
त्रउद्योजक प्रशिक्षणासह सर्व पातळ्यावर मार्गदर्शन करणाऱ्या ट्रस्टचा वर्धापन दिन म्हणजे उद्योगबोध उत्सव : व्यवसाय करताना त्यासंदर्भातील माहिती नसते. व्यवस्थापन, प्रशासन, विक्रीकौशल्य, ग्राहकसंबंध जोपासणे आदी बाबी त्यांना अवगत नसतात. निरनिराळ्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे सॅटर्डे क्लब उद्योजकांना प्रशिक्षित करत असते. सॅटर्डे क्लब दरवर्षी आपला वर्धापनदिन ह्यउद्योगबोधह्ण साजरा करते. यात गुणी तरुण, होतकरू उद्योजकांना गौरविले जाते. औद्योगिक क्षेत्रातील नामांकित वक्त्यांना निमंत्रित केले जाते. यामुळे उद्योजकांचा आपल्या व्यवसायाकडे पाहण्याचा कल बदलून जातो.

त्रयार्षीचा उद्योगबोध-२०१५ 'सीमोल्लंघन' या संकल्पनेवर : यार्षीचा उद्योगबोध ह्यसीमोल्लंघनह्ण या संकल्पनेवर आधारलेला आहे. सीमोल्लंघन म्हणजे आपली वेस वा सीमा ओलांडणे. येथे सीमोल्लंघन अपेक्षित आहे ते म्हणजे निव्वळ आपापल्या परिघात व्यवसाय न करता तो परिघ सॅटर्डे क्लबच्या साहाय्याने वाढविणे. साद घालणाऱ्या जागतिक बाजारपेठेला प्रतिसाद देणे. जागतिक व्यवसायाचे नियोजन आखणे, जागतिक बाजारपेठेचे मापदंड ओळखणे, जागतिक स्तरावर व्यावसायिक कल काय आहे औद्योगिक बदलाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे याची माहिती घेणे आदी सर्व मुद्दे उद्योगबोध-२०१५ मध्ये मांडले जाणार आहेत.
वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजन, नामवंत उद्योजक, तंत्रविषेशज्ञांसह व्यावसायिकही येणार : ९ आणि १० जानेवारी २०१५ रोजी कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या भव्य सभागृहात यंदाचा उद्योगबोध होणार असून पहिल्यांदाच जागतिक स्तरावरील विविध देशांचे उद्योजकीय शिष्टमंडळे, व्यापारी संघटना सामील होणार आहेत. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी, उत्पादन, औषधे, माहिती तंत्रज्ञान, आदरातिथ्य, सेवाक्षेत्र आदी क्षेत्रांतील नामवंत उद्योजक, व्यावसायिक आणि तंत्रविशेषज्ञांची मांदियाळी असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या उद्योजकांना या सर्वांना व्यक्तिश: भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपापले उत्पादन वा सेवांना निवडक समूहाच्या प्रमुखाला दाखविता येणार आहे.