आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Industrialist Meet In Lakshya 2020 Conference

‘लक्ष्य 2020’ परिषद मुंबईत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बदलत्या जगाची आणि जागतिक स्तरावरची आव्हाने स्वीकारून मराठी माणसाने उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात भरारी घ्यावी या उद्देशाने मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाने ‘लक्ष्य 2020’ ही अखिल महाराष्ट्र मराठी व्यावसायिक उद्योजक परिषद मुंबईत आयोजित केली आहे.

आणखी आठ वर्षांनी उद्योगाच्या क्षेत्रात मराठी तारे तेजाने चमकावेत या संकल्पनेतून 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी ही परिषद दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात होणार आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांच्या मुलाखतींबरोबरच व्यापार-उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मौलिक विचार या परिषदेतील विविध सत्रांत ऐकायला मिळणार आहेत.