आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marcedez Benz ' Bee Class 180 CDI' Introduce In Car Market

मर्सिडीझ बेंझची 'बी क्लास 180 सीडीआय' ही नवी कार बाजारात दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या छोटेखानी मोटारींच्या ताफ्यात मर्सिडीझ बेंझने आता ‘बी क्लास 180 सीडीआय’ या नव्या मोटारीची भर घातली आहे. डिझेलवर चालणारी ‘बी क्लास’ म्हणजे एसयूव्हीमधील उपयोगिता आणि सेडनमधील आराम यांचा चांगला मेळ घालण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. मर्सिडीझने नऊ महिने अगोदर ‘बी क्लास’ श्रेणीतील पेट्रोल मोटार वाहन बाजारात दाखल केली होती. या मोटारीची विक्री अगोदरच 500 पर्यंत गेली आहे. परंतु ही नवी डिझेल बी क्लास येणा-या काही महिन्यांत दोनअंकी वाढ साध्य करून देईल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. इंधनाच्या किमतीत वाढ होऊनदेखील डिझेल मोटारींना अद्याप मागणी आहे. अधिक सक्षम इंजिन, नव्या सुविधांच्या बळावर या डिझेल मोटारीलादेखील चांगला प्रतिसाद मिळेल, अशी खात्री कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एबेरहार्ड केर्न यांनी ‘बी क्लास’च्या अनावरणप्रसंगी व्यक्त केली. नव्या पिढीतील ए क्लास आणि बी श्रेणीतील छोटेखानी मोटारींना वाहन बाजारात चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या नऊ-दहा महिन्यांत एक हजारपेक्षा जास्त मोटारींची विक्री केली आहे. ‘ए क्लास’ ही मोटार बाजारात आल्यानंतर दहा दिवसांच्या आतच 400 मोटारींचे बुकिंग झाल्याचे केर्न यांनी सांगितले.


ही आहेत वैशिष्ट्ये
> प्रवासी, चालकाला सुरक्षा देण्यासाठी सात एअरबॅग्ज,
> यूएसबी सॉकेट आणि कार्यक्षम सीडी प्लेअर
> अंतर्गत सजावटीमध्ये ब्राऊन बार वॉलनट सॅटिन फिनिशिंग
> ब्लूटूथ इंटरफेस, ऑडिओ स्टिमिंग, टेलिफोन कीपॅड
> मध्यवर्ती इन्फोटेनमेंट कंट्रोलरला रंगीत डिस्प्ले; 14.7 सेंमी स्क्रीनचा आहे.


कमाल वेग 190 किमी प्रतितास
डिझेल मोटारीत 50 लिटरची टाकी
चार रंगसंगतीत : ज्युपिटर रेड, सायरस व्हाइट, पोलर सिव्ह, न्यू मोनोलिथ ग्रे.
किंमत : 22.60 लाख रु. (एक्स-शोरूम, मुंबई)