आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या क्षणी असे करा कर बचतीचे नियोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 31 मार्च अगदी चार दिवसांवर आला आहे. मार्चअखेरची उलटी गणती सुरू झाली असून अद्याप कर बचतीसाठी गुंतवणूक केली नसल्यास आणखी चार ते पाच दिवस हाती आहेत. या काळातही उत्तम कर बचतीचे नियोजन होऊ शकते. शेवटच्या क्षणी कर बचत करताना करदात्याने मुळीच घाबरण्याचे कारण नाही. कारण अशा वेळीच बहुतेक करदाते मिस सेलिंगचे शिकार होत असतात. त्यामुळे कर बचतीचे नियोजन घाई गडबडीत करू नये. तसेच कर बचतीची गुंतवणूक करताना काही बाबी लक्षात ठेवाव्यात, प्रसंगी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

इतर पर्याय
राजीव गांघी इक्विटी स्कीम, एनपीएस आणि युनिट लिंक्ड पेन्शन योजना असे पर्याय आहेत. तुमच्या कमाईवर कुटुंब अवलंबून असेल, तर शुद्ध विम्याचा टर्म प्लॅन घेणे केव्हाही चांगले. या विम्याच्या प्रीमियमवरही 80 सीअंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. तसेच 80 डीअंतर्गत आरोग्य विमा प्रीमियमवरही 15 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. अधिसूचित बँकांतील पाच वर्षांच्या मुदत ठेवी करता येतील.

एचआरएद्वारे बचत
समजा तुम्ही पालकांसह राहत असाल, तर त्यांना योग्य ते घरभाडे देऊन त्याची रीतसर पावती कार्यालयामध्ये जमा करावी. अशा रीतीने एचआरएद्वारे कर बचतीचा फायदा घेता येईल.

सुटीच्या दिवशी प्राप्तिकर कार्यालये सुरू राहणार
आर्थिक वर्षाच्या समाप्तीला काही दिवस शिल्लक असल्याने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सर्व प्राप्तिकर कार्यालये या आठवड्यातील 29, 30 आणि 31 मार्च रोजी सुटीच्या दिवशीही चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सीबीडीटीने देशातील सर्व प्रमुख प्राप्तिकर आयुक्तांना सर्व कार्यालये शनिवारी- 29 मार्च, रविवारी- 30 मार्च आणि सोमवारी- 31 मार्च रोजी सुरू ठेवण्याचे व तेथे योग्य व्यवस्था ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 31 मार्च रोजी गुढीपाडवा सण आहे तरी करभरणासाठी प्राप्तिकर कार्यालये सुरू राहतील.