आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅरियट हॉटेल समूह करणार भारतात आणखी गुंतवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- न्यूयॉर्क शेअर बाजारावर नोंदणी असलेल्या मॅरियट हॉटेल समुहाने भारतात आणखी 45 हॉटेल सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील तीन नवीन हॉटेल आगामी 45 दिवसात सुरु केली जाणार असल्‍याची माहिती मॅरियटइंटरनॅशनलच्या दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष राजीव मेनन यांनी चाकण येथे पत्रकार परिषदेत दिली.

पुणे परिसरातील चौथे आणि देशातील दहावे (हॉटेल कोर्टयार्ड) आजपासून चाकण येथे सुरु झाले. त्याच्या उदघाटनप्रसंगी मेनन पुढे म्हणाले, की येत्या काही महिन्यात बेंगळुरू, दिल्ली येथे व्यवसाय विस्तार केला जाणार आहे. त्यात फ़ेअरफिल्ड हा ब्रँड बेंगळुरूला सुरु होणार आहे. हिंजवडीत ज्याप्रमाणे आम्हाला यश मिळाले तसे येथेही मिळेल कारण आम्ही प्रथम येथे आल्याचा फायदा घेता येणार आहोत. गेल्या दहा वर्षात आमची व्यवसाय वाढ स्पर्धकांच्या तुलनेत वेगाने होते आहे. हॉटेल उद्योगाची सरासरी वाढ सहा टक्के असली तरी आमची मात्र दोन अंकी म्हणजे दुप्पट आहे .

दर वर्षी आम्ही 10-20 नवे करार करत आहोत असे नमूद करून ते म्हणाले, की चाकणसाठी आम्ही रेद्स्टोन समूहाच्या शकील लडाख यांच्याशी करार केला असून त्‍यासाठी मालमत्ताही विकसित केली. या भागात बहुराष्ट्रीय वाहन कंपन्या आणि नवीन विमानतळ होणार असल्याने उद्योजक ग्राहक मिळतील. तसेच आजूबाजूच्या भागातील खेड, पिंपरी, तळेगाव, नारायणगाव येथील लोकांना सेवा देता येईल.

रुपया डॉलरच्या तुलनेत दुबळा झाल्याने आम्हाला इष्टापत्तीच ठरणार असून परदेश प्रवासापेक्षा देशातील अर्बन रिसोर्टला ग्राहक प्राधान्य देतो आहे. गोव्यात येणारे ग्राहक वाढण्याचे तेच कारण आहे. परकी ग्राहकांपेक्षा भारतीय ग्राहकसंख्या 30 टक्क्यांवरून 67 टक्के झाली आहे. एक मात्र नक्की आहे की ज्या गोष्टी आम्हाला आयात कराव्या लागतात त्याच्या खर्चात रुपया घसरल्याने वाढ झाली आहे.


चाकणच्या हॉटेल कोर्टयार्डमध्ये आसपासच्या गावातील 50 टक्के लोकांना रोजगार देण्यात आला आहे. सरव्यवस्थापक रितू चावला म्हणाल्या, की येथील लोकांना सामावून घेण्याने एक सामाजिक योगदान दिले जाते तसेच अप्रत्यक्ष रोजगार संधीही निर्माण होते. कोर्टयार्डमध्ये 250 लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. कोर्टयार्डमध्ये 175 रूम असून ते 11725 चौरस फुट जागेत उभारण्यात आले आहे. फोक्‍सवॅगन, डेमलर, महिंद्र अशा मोठ्या कंपन्या आमच्या ग्राहक होतील असे त्यांनी नमूद केले.