आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयच्या धोरणावर राहील बाजाराची नजर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मागील आठवड्यात अपेक्षेप्रमाणे बाजारातील वातावरण सावध, परंतु सकारात्मक राहिले. फंड तसेच टेडर्सकडून निवडक समभागांची जोरदार खरेदी झाल्याने तेजी दिसून आली. डिझेलच्या किमती अंशत: नियंत्रणमुक्त करणे तसेच गारची अंलबजावणी 2016 पर्यंत पुढे ढकलणे या निर्णयामुळेही तेजीला बळ मिळाले. विदेशी फंडांनी जोरदार खरेदी केल्याने आघाडीच्या काही समभागांनी 52 आठवड्यांचा उच्चांक नोंदवला. फिचने भारताच्या पतमानांकनाबाबत दिलेल्या इशा-या कडे बाजाराने दुर्लक्ष केले, हे विशेष. वित्तीय तूट फुगत चालल्याचे कारण देत फिचने भारताचे सार्वभौम पतमानांकन नकारात्मक राहण्याचा इशारा दिला होता. बड्या कंपन्यांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे पतमानांकन घटण्याच्या इशा-या ची तीव्रता कमी केली. असे असले तरी बाजाराने सर्व सकारात्मक घटकांना डिस्काउंट केले आहे. आघाडी कायम ठेवण्यासाठी बाजार नव्या ट्रिगरच्या शोधात आहे.

आता बाजाराची नजर 29 जानेवारी रोजी जाहीर होणा-या रिझर्व्ह बँकेच्या तिमाही पतधोरण आढाव्याकडे राहील. मागील आढाव्यात आरबीआयच्या गव्हर्नरनी सकारात्मक संकेत दिले होते. येत्या मंगळवारी जाहीर होणा-या पतधोरणात प्रमुख व्याजदरात कपातीची शक्यता आहे. व्याजदरातील पाव टक्का कपातीचा अंदाज बाजाराने यापूर्वीच गृहीत धरला आहे. अशा स्थितीत आरबीआयने पुढचे पाऊल टाकत सीआरआरमध्ये पाव टक्का किंवा प्रमुख व्याजदरात अर्धा टक्का कपात केल्यास बाजारात तेजी येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सावध सकारात्मकता आहे. चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) तसेच घाऊक विक्री व औद्योगिक उत्पादनातील मजबुतीच्या संकेतानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात हे वातावरण दिसून आले. मात्र,
युरो झोनमधून येणा-या आर्थिक संकेतांनी याचा प्रभाव काही प्रमाणात कमी केला.

जोपर्यंत निफ्टी 5991 च्या पातळीवर बंद होतोय तोपर्यंत देशातील बाजारातील वातावरण सतर्कतेसह सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. याप्रमाणे 5991 ही निफ्टीसाठी आधार पातळी असेल. निफ्टी या पातळीखाली घसरल्यास बाजारावर त्याचा प्रभाव पडेल. निफ्टीला मग 5939 या पातळीवर चांगला सपोर्ट मिळेल. तत्पूर्वी निफ्टीला 5964 या पातळीवर काहीसा आधार मिळेल. या पातळीच्या आसपास बार्गेन खरेदी आणि कन्सोलिडेशन दिसून येईल.
वरच्या बाजूचा विचार केल्यास निफ्टीला 6078 या पातळीवर पहिला अडथळा होईल. निफ्टी ही पातळी पार करून पुढे गेल्यास 6132 या स्तरावर पुढचा अडथळा होईल. मात्र, या पातळीवर जोरदार खरेदी झाल्यास हा अडथळा टिकणार नाही. त्यानंतर निफ्टीला 6181 या पातळीवर तगडा अडथळा होईल.शेअर्सच्या बाबतीत, या आठवड्यात अंबुजा सिमेंट, अबान ऑ फशोअर लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी) चार्टवर उत्तम वाटले.

अंबुजा सिमेंट लिमिटेडचा मागील बंद
भाव 198 रुपये आहे. याचे पुढील टार्गेट 203 आणि स्टॉप लॉस 192 रुपये आहे. अबान ऑ फशोअर लिमिटेडचा मागील बंद भाव 375.10 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 384 रुपये, तर स्टॉप लॉस 363 रुपये आहे. तर एल अँड टीचा मागील बंद भाव 1552.30 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1588 आणि स्टॉप लॉस 1508 रुपये आहे.


लेखक तांत्रिक विश्लेषक आणि
moneyvistas.com चे सीईओ आहेत.
Vipul.verma@dainikbhaskargroup.com