आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात पडझड; सेन्सेक्स २८ हजारांखाली, निफ्टी ८,४०० च्या खाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चीन आणि अन्य जागतिक बाजारात झालेल्या विक्रीचा मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर विपरीत परिणाम झाला. बाजारात झालेल्या जबरदस्त विक्रीच्या मा-यात ऊर्जा, धातू आणि भांडवली वस्तू समभागांनी आपटी खाल्ली. सेन्सेक्स ३२२ अंकांनी घसरून २८ हजार अंकांच्या खाली गेला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ९७.५५ अंकांनी घसरून ८,४०० अंकांच्या खाली जात अखेर ८३४०.७० अंकांवर स्थिरावला. सलग तिस-या सत्रात बाजाराने घसरणीचा सूर कायम ठेवला आहे.

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींनी पाच वर्षांचा नीचांक गाठूनदेखील चीन शेअर बाजाराला बळकटी मिळू शकली नाही. कर्जविषयक नियम कडक झाल्याने तसेच युरोप शेअर बाजारातील घसरणीचा चीनच्या बाजारावर विपरीत परिणाम झाल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळपास दिवसभर नकारात्मक स्थितीतच राहिला. सततच्या विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स २७,७६३.८२ आणि २८,१५७५३ अंकांच्या पातळीत राहिला. दिवसअखेर सेन्सेक्स ३२२.३९ अंकांनी घसरून २७,७९७.०१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. ३० आॅक्टाेबरनंतर झालेली ही मोठी घसरण आहे.

टॉप लुझर्स : टाटा पॉवर, भारती एअरटेल. एनटीपीसी, टाटा स्टील, हिंदाल्को, भेल, एलअँडटी, टाटा मोटर्स, विप्रो, स्टेट बँक, सिप्ला, मारुती सुझुकी, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय.
क्षेत्रीय निर्देशांक आपटले : ऊर्जा : २.७५ %, धातू : २.७१ %, भांडवली वस्तू : २.२९ %, ग्राहकोपयोगी वस्तू : २.११%

रुपया घसरला
आयातदारांकडून डॉलरला चांगली मागणी आल्याने मंगळवारी रुपयाचे मूल्य घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया ५ पैशांनी घसरून ६१.८८ वर आला.

सोने चकाकले
जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक कल आणि लग्नसराईमुळे मागणीत झालेली वाढ यामुळे मंगळवारी मौल्यवान धातू तेजीने चकाकले. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे १७० रुपयांनी वधारून २६,८२० झाले. चांदी किलोमागे १५० रुपयांनी वाढून ३६,८०० वर पोहोचली. सराफा व्यापा-यांनी सांगितले, लग्नसराईमुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे.

९०० समभाग वधारले, २००० समभाग आपटले
आशियाई शेअर बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-याचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याचे बाेनान्झा पोर्टफोलिओचे सहनिधी व्यवस्थापक हिरेन धकान यांनी सांिगतले. चालू खात्यातील तूट जुलै ते सप्टेंबर या ितमाहीत १०.१ अब्ज डॉलरपर्यंत वाढल्यामुळेदेखील बाजारात चिंता निर्माण झाल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले.