आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Market In Boom: Sensex On 266 Numbers, Nifty Increases 79 Numbers

बाजारात तेजीचा पोळा: सेन्सेक्स 266 अंकांनी, तर निफ्टी 79 अंकांनी वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चीनमधील उत्पादनाची आकडेवारी सकारात्मक आल्याने शेअर बाजारात तेजीचा पोळा साजरा झाला. आशिया आणि युरोपातील शेअर बाजारातील तेजीने सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीला बळ दिले. दिग्गज कंपन्यांच्या समभाग खरेदीमुळे सेन्सेक्स 266.41 अंकांच्या वाढीसह 18,886.13 वर बंद झाला. निफ्टीने 78.95 अंकांच्या कमाईसह 5,550.75 ही पातळी गाठली.


आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची जोरदार खरेदी झाली. एफएमसीजी, धातू आणि रिअ‍ॅल्टी कंपन्यांच्या समभागांना सोमवारी चांगली मागणी होती. आयटीसी आणि रिलायन्सच्या समभागातील तेजीने सेन्सेक्सच्या वाढीत 140 अंकांचा वाटा उचलला. भारतीय उत्पादनाचे मापदंड असणारा एचएसबीसी मार्केट पीएमआय निर्देशांक साडेचार वर्षांत प्रथमच 48.5 अंकांवर आल्याने बाजारात तेजीचा उत्साह आला. त्यातच आशिया आणि युरोपातील प्रमुख बाजारातील सकारात्मक वातावरणाने या तेजीला जास्तीचे बळ मिळाले. कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीमुळेही बाजाराला दिलासा मिळाला.


चीनच्या आकडेवारीने शेअर बाजारात उत्साह
चीनमधील उत्पादनाचे आकडे चांगले आल्याने जगभरातील सर्वच शेअर बाजारात तेजी दिसून आली. देशातील पहिल्या तिमाहीतील जीडीपी 4.4 टक्क्यांवर आली असल्याकडे बाजाराने दुर्लक्ष केल्याचे जाणवले.
निधी सारस्वत, वरिष्ठ विश्लेषक, बोनान्झा पोर्टफोलिओ