चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांचे भारतात आगमन झाल्याने शेअर बाजारातील हरवलेला उत्साह पुन्हा परतला आहे. मागील आठवड्यापासून बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. आता गुंतवणूकदारांचे सगळे लक्ष फेडरल रिझर्व्ह मीटिंगकडे लागले आहे.
शी जिंगपिंग यांचा भारत दौरा, अमेरिकेत होणारी फेडरल रिझर्व्ह मीटिंग आणि स्कॉटलँडला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याचा निर्णय हे तिन्ही मुद्दे बाजारावर मोठा परिणाम करणारी आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शेअर बाजारावर कसा परिणाम होतो, हे स्पष्ट होणार आहे.
गेल्या 8 सप्टेंबरला निफ्टीने 8180 अंकांनी उच्चाक गाठला होता. त्यानंतर मात्र बाजारात निफ्टी झपाट्याने खाली आला. मागील सहा सत्रात निफ्टी जळपास तीन टक्क्यांपेक्षा जास्त खाली आला आहे.
बाजारात पडझड सुरु असताना गुंतवणूकदारांनी काय करावे?
'बोनांजा'चे एव्हीपी पुनीत किनरा यांच्या मते, सध्या बाजारावर नफाखोरीची लाट आली आहे. अशा परिस्थितीत छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी संयम बाळगावा. चांगल्या फंडामेंटल शेअर्समध्ये गुंतवणूक करावी.
'फॉर्च्यून फिस्कल'चे डायरेक्टर जगदीश ठक्कर यांच्या मते, फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसीनंतरच गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांना पुढील पाऊल उचलावे लागेल.
'बाजाराचे फंडामेंटल' अंबरीश बालिगा यांच्यानुसार, बाजारात सध्या कन्सोलिडेशन पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सपासून थोडे लांबच राहायला पाहिजे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, निफ्टीचा टेक्नीकल चार्ट्स...