आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलावरून बाजाराची घसरण, सेन्सेक्सचा ६ आठवड्यांचा नीचांक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सेन्सेक्सने घेतलेली उसळी फक्त तेवढ्यापुरतीच दिलासा देणारी ठरली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी घसरल्या. त्यातच रुपयानेदेखील लोटांगण घातले. बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात रिलायन्स आणि ओएनजीसी यांच्या समभागांना फटका बसून सेन्सेक्सही २२९.०९ अंकांनी घसरून २७,६०२.०१ अंकांच्या सहा आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील ६२.७५ अंकांनी घसरला. जवळपास दीड महिन्यांनंतर निफ्टी पहिल्यांदाच ८३,०० अंकांच्या खाली जात ८२९२.९० अंकांच्या पातळीवर बंद झाला. एकीकडे कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी माेठी घट झाली, तर दुस-या बाजूला रुपयानेदेखील डाॅलरच्या तुलनेत ६२.३ अशी एक महिन्याची नीचांकी पातळी गाठली. वाॅल स्ट्रीट शेअर बाजारातील पडझडीमुळे आशियाई शेअर बाजारातही नरमाई आली. बाजारात येणा-या भांडवलाचा आेघ कमी झाला आहे. हा सर्व एकत्रित परिणाम बाजारासाठी निराशाजनक ठरला.
बाजारात झालेल्या िवक्रीच्या मा-यात तेल आणि वायू, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, बँक समभागांना माेठा फटका बसला.

टाॅप लुझर्स : आेएनजीसी, टाटा स्टील, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा पाॅवर, गेल, इन्फाेिसस, हीराे माेटाेकाॅर्प, एनटीपीसी, टाटा माेटर्स, आयसीआयसीआय बँक, िसप्ला, िवप्राे
टाॅप गेनर्स : काेल इंिडया, हिंदाल्काे, डाॅ. रेड्डीज लॅब, मारुती.