आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती करणार 3500 कोटींची गुंतवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोटारनिर्मितीत आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने आपल्या बाजारहिश्शाला बळकटी देण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये साडेतीन हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक योजना आखली आहे.


सुझुकी मोटार कॉर्पोरेशन या पालक कंपनीच्या एकूण वाहन विक्रीत 40 टक्के वाटा असलेल्या मारुती सुझुकीने विदेशात प्रकल्प उभारण्याचा विचार करतानाच आफ्रिका, मध्य-पूर्व आणि नजीकच्या देशांमध्ये निर्यात करण्याची योजना आखत असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये भागधारकांना उद्देशून म्हटले आहे.


उत्पादन क्षमतेत वाढ करणे त्याचप्रमाणे बाजारात नवीन वाहने आणण्यासाठी कंपनी सर्व गुंतवणूक योजना कायम ठेवणार असल्याचे सांगून भार्गव पुढे म्हणाले की, मारुतीच्या गुजरात प्रकल्पाचे काम सुरू झाले असून 2015 - 16 वर्षाच्या अखेरीस येथून उत्पादनास प्रारंभ होण्याची शक्यता आहे.