आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारतीची 800 CC डिझेल कार लवकरच होणार लॉंच, 30 किमीचा देईल मायलेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील प्रसिद्ध कार उत्‍पादक कंपनी मारुती सुझुकीची एक स्‍वस्‍त आणि लहान डिझेल कार लवरकच लॉंच होणार आहे. ही गाडी 800 सीसी क्षमतेची राहणार असून भारतीय रस्‍त्‍यांवर धावणारी 1000 सीसीपेक्षा कमी क्षमतेची ही पहिलीच डिझेल कार ठरणार आहे. मध्‍यम उत्‍पन्‍न गटातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून ही कार तयार करण्‍यात येत आहे.

पेट्रोलच्‍या वाढत्‍या किंमती लक्षात घेऊन सर्वच कार निर्माते डिझेल कार निर्मितीवर भर देत आहेत. सध्‍या स्‍वस्‍त डिझेल कार लॉंच करण्‍याची स्‍पर्धा सुरु झाली आहे. त्‍यात मारुती सुझुकी उडी घेत आहे.

मारुती सुझुकीच्‍या या नव्‍या कारबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर..