आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती, ह्युंदाईच्या कार नव्या वर्षात महागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कार खरेदीसाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करणार्‍यांनी आता जास्त काळ थांबणे योग्य ठरणार नाही. नव्या वर्षातील जानेवारीपासून कारच्या किमती वाढणार आहेत. देशातील प्रमुख कार निर्मात्या कंपन्या मारुती आणि ह्युंदाईने पुढील महिन्यापासून कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमडब्ल्यू, ऑडी, र्मसिडीझ आणि होंडा या कंपन्यांनी किंमतवाढीची घोषणा यापूर्वीच केली आहे.
मारुती सुझुकी इंडियाचे सीओओ (मार्केटिंग आणि विक्री) मयंक परीक यांनी सांगितले, कंपनीने जानेवारी 2014 पासून किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा पूर्ण भार उचलणे आता कंपनीला शक्य नसल्याने त्याचा काही भार ग्राहकांवर टाकण्याचे कंपनीने ठरवले आहे. मारुतीकडे सध्या एम-800 पासून ग्रँड व्हिटारापर्यंतच्या मॉडेलचा ताफा आहे. दिल्ली एक्स शोरूम किमतीनुसार या कार 2.13 लाख रुपयांपासून ते 24.6 लाख रुपयांपर्यंत सध्या उपलब्ध आहेत. कंपनीने याआधी ऑक्टोबरमध्ये सर्व कारच्या किमती 10 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या होत्या.
कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जानेवारीपासून कारच्या किमती वाढवण्यात येतील, असे ह्युंदाई मोटर इंडियाने स्पष्ट केले. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विभागीय प्रमुख (मार्केटिंग व विक्री ) राकेश र्शीवास्तव यांनी सांगितले, कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि सध्याची बाजारस्थिती लक्षात घेऊन जानेवारीपासून सर्व कारच्या किमती वाढवण्यात येतील. सर्व मॉडेलच्या किमती वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे.