आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुतीची एर्टिगा मार्चमध्ये रस्त्यावर, अल्टो बंद होणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑटो एक्स्पोमध्ये धूम माजवणारी मारुती सुझुकीची एर्टिगा ही शानदार कार मार्चमध्ये बाजारात दाखल होणार आहे. कंपनीच्या एका अधिका-याने सांगितले की, ऑटो एक्स्पोमध्ये लोकप्रिय ठरलेली आमची एमपीव्ही एर्टिगा कार आता मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या कारबाबत वाहनप्रेमींमध्ये बरीच उत्सुकता आहे.
या कारच्या किमतीविषयी कंपनीकडून अधिकृत काहीही सांगण्यात आले नाही. 1377 सीसीच्या पेट्रोल एर्टिगाची किमत 7 लाख रुपयांपासून सुरू होईल, असे समजते, तर डिझेल एर्टिगा आठ लाख रुपयांपासून सुरू होईल.
या कारमध्ये सात जण आरामात बसू शकतात. तसेच मागचे आसन फोल्ड करून सामान ठेवण्यासाठी त्याचा वापर करता येतो. या कारचा लूक आकर्षक करण्यात आला असून विविध रंगांत ती उपलब्ध होणार असल्याचे कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.
अल्टो, मारुती 800 बंद होणार
भारतात सर्वाधिक विक्री असणा-या अल्टोचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय मारुती सुझुकीने घेतला आहे, तर विक्रीचे अनेक विक्रम नोंदवणा-या मारुती -800 या कारचेही उत्पादन बंद करण्यात येणार आहे. या दोन कारचे उत्पादन बंद करून कंपनी एक नवी कार बाजारात आणणार आहे. मारुती सुझुकी कंपनीचे एम.डी. शिंजो नाकानिशी यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला. ते म्हणाले की, या दोन कारचे उत्पादन बंद करून एक नवी कार बाजारात आणण्याची आमची योजना आहे. ही नवी कार तयार करण्याचे काम सुरू आहे. 2013 पर्यंत ही कार बाजारात येण्याची शक्यता आहे. ही कार अधिक मायलेज देणारी आणि आकर्षक लूकची असेल. किंमत कमी ठेवण्याच्या दृष्टीने या कारचे इंजिन 800 सीसीचे राहील. या कारच्या उत्पादनासाठी कंपनी 550 कोटी रुपये खर्च करणार आहे. मारुतीसमोर अनेक कंपन्यांनी आव्हान उभे केले आहे. ह्युंदाईने इ-ऑन मैदानात आणून मोठे आव्हान दिले आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मारुतीने स्वस्त आणि आकर्षक मॉडेल बाजारात आणण्याचे ठरवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.