आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपकाळातील मारुती गाड्यांबाबत तक्रारी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरगाव - विक्रीच्या रुळावरून घसरलेली मारुती-सुझुकी कंपनीची गाडी पुन्हा रुळावर येत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या संपकाळात तयार झालेल्या गाड्यांमुळे कंपनीच्या प्रतिमेला तडे जात आहेत. संपकाळात तयार करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे संपकाळातील मारुती गाड्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील मतभेदातून मारुतीच्या मनेसर येथील कारखान्यात 2011 मध्ये तीन वेळा कामगार संपावर गेले होते. हा संप अडीच महिन्यांपर्यंत चालला होता. या काळात तयार करण्यात आलेल्या गाड्यांबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. सर्वाधिक तक्रारी स्विफ्टसंदर्भात आहेत. कंपनीच्या उत्कृष्ट कारमध्ये स्विफ्टची गणना होते. स्विफ्टसाठी ग्राहकांनीही बरीच प्रतीक्षा सहन केली होती. स्विफ्ट आणि डिझायर या गाड्यांबाबत आता तक्रारी येत आहेत. डेस्क बोर्डमधून आवाज येणे, मागील सीटचे लॉक खराब होणे, गाडीचा वेग जास्त झाल्यास इंजिनमधून विशिष्ट आवाज येणे अशा तक्रारी ग्राहक करत आहेत. गुरगावातील एका कार एजन्सीच्या वर्कशॉपमधील इंजिनियरच्या मते, आतापर्यंत आलेल्या तक्रारी आॅगस्ट 2011 ते नोव्हेंबर 2011 या काळात तयार करण्यात आलेल्या गाड्यांबाबतच आहेत. या काळातील स्विफ्ट खरेदी करणारे प्रदीप यांच्या मते, मी गेल्या 12 वर्षांपासून मारुतीच्या गाड्या वापरतो. मात्र, नव्या स्विफ्टइतक्या तक्रारी इतर कोणत्याही गाड्यांच्या नाहीत, तर धर्मवीर यांनी सांगितले की त्यांनी डिझायर खरेदी केली. मात्र, यात एवढ्या तांत्रिक त्रुटी आहेत की अनेकवेळा तक्रारी करूनही त्या दुरुस्त झाल्या नाहीत.
मारुतीच्या मनेसर येथील कारखान्यात डिझेल कारची निर्मिती केली जाते. या कारख्यान्यात चार जून ते 21 आॅक्टोबर या काळात तीन वेळा कामगार संपावर गेले. हा संप साधारण अडीच महिने चालला होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार संपकाळातही बहुतेक वेळा कंपनीने कारचे उत्पादन केले आहे. याच काळात कंपनीने गुरगावच्या कारखान्यातही स्विफ्टचे उत्पादन केले होते. त्यानंतर मनेसर येथील कारखान्यात नव्या कर्मचाºयांकडून काम करण्यात आले होते. कंपनीच्या सूत्रानुसार संपकाळात अधिक काम करण्याच्या नादात दर्जाकडे काहीसे दुर्लक्ष झाले, त्याचाच परिणाम आता दिसत आहे.
कंपनीच्या क्वालिटी कंट्रोल विभागाच्या प्रवक्त्याच्या मते, संपकाळात तयार करण्यात आलेल्या काही गाड्यांमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या अंतिम चाचणीसाठी कंपनीतच थांबवण्यात आल्या होत्या. गाड्यांच्या बाबतीत विविध तक्रारी नेहमीच येत असतात. त्यांच्या निराकरणासाठी वितरकांना खास सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, यासंदर्भात थेट कंपनीकडे काही तक्रारी आल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इंजिनिअरचे मत
गुरगावातील एका कार एजन्सीच्या वर्कशॉपमधील इंजिनिअरच्या मते, आतापर्यंत आलेल्या अनेक तक्रारी आॅगस्ट 2011 ते नोव्हेंबर 2011 या काळात तयार करण्यात आलेल्या मारुती कंपनीच्या गाड्यांबाबतच आहेत.
काय आहेत तक्रारी ?
मारुतीच्या उत्कृष्ट कारपैकी एक स्विफ्टसंदर्भात सर्वाधिक तक्रारी
डेस्क बोर्डमधून आवाज येणे, मागील सीटचे लॉक खराब होणे, वेग जास्त झाल्यास इंजिनमधून विशिष्ट आवाज येणे असे या तक्रारींचे स्वरूप आहे.
इंजिनिअरच्या मते, आतापर्यंत आलेल्या तक्रारी संपकाळात तयार झालेल्या कारबाबत आहेत.