आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीचा नफा घटल्याने मारुतीच्या कार 20 हजार रुपयांनी महागल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेशी विनिमय दरात वारंवार होत असलेल्या बदलांचा मारुती उद्योगाच्या नफा क्षमतेवर प्रचंड ताण येत आहे. हा ताण हलका करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या या आघाडीच्या मोटार कंपनीने आपल्या सर्व कारच्या किमतीत बुधवारपासून 20 हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीच्या विपणन आणि विक्री विभागाचे मुख्य कामकाज अधिकारी मयंक पारेख यांनी सांगितले. वास्तविक पाहता गेल्याच महिन्यात कंपनीने कारच्या किमतीत 1 ते 3 टक्क्यांनी वाढ केली होती.

विदेशी चलनातील फरकाचा नफा क्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ करणे अगत्याचे झाले असल्याचे पारेख म्हणाले.
मारुती 800 पासून ते आयात करण्यात येणा-या किझाशीपर्यंत 2.09 लाख रुपयांपासून ते 17.52 लाख रुपयापर्यंतच्या सर्व श्रेणीतील वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात येणार आहे.
मनेसर प्रकल्पातील हिंसाचार आणि चलनातील चढ- उतार याचा कंपनीच्या नफ्यावरदेखील परिणाम झाला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसºया तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 5.41 टक्क्यांनी घसरण होऊन तो 227.45 रुपयांवर आला.