आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुतीच्या \'सेलेरियो\'ला उत्स्फुर्त प्रतिसाद; दिवसाला होताहेत 1000 कार बुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मारूती सुझुकीची ऑटोमॅटीक कार 'सेलेरियो'ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 'ऑटो एक्सपो 2014'मध्ये मारुतीने बहुचर्चित 'सेलेरियो' लॉन्च केली होती. 'सेलेरियो'ची बुक‍िंग सुरु झाली असून दिवसाला 1000 कार बुक होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

कंपनीने 'ऑटो एक्सपो'मध्ये सादर करण्‍यापूर्वीच 'सेलेरियो' कारचे प्रमोशन सुरु केले होते. ग्राहकांमधील उत्सुकता लक्षात घेता कंपनीने 'ऑटो एक्सपो'मध्येच 'सेलेरियो'चे लॉन्चिंग करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे या कारची किंमत 3.90 लाख रूपये आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, प्रतिलिटर 23 किलोमिटरचा मायलेज देईल मारूती 'सेलेरियो'