नवी दिल्ली- मारूतीची नवी कार सियाज ऑक्टोबरच्या उत्सवाच्या काळात लॉन्च झाली आहे. कंपनीची ही कार मारूतीच्या एसएक्स-4 ला रिप्लेस करण्यासाठी लॉन्च करण्यात येत आहे.
मायलेज
मारूती सियाजचे डिझेल इंजिन 26.3 किमी. प्रतिलिटरचे मायलेज देते, तर दुसरीकडे पेट्रोल इंजिन असलेली सियाज 20.7 किमी. प्रतिलिटर एवढे मायलेज देते
किंमत
या कारच्या अधिकृत किंमत अजून कळालेली नसून ही कार 7 ते 10 लाखांदरम्यान असेल.
या कारसमोर उभे करेल आव्हान
मारूती सुझुकीची सियाज ही कार
होंडा सिटी, फियाट लेनिया आणि निस्सानच्या सनी या कारांना टक्कर देऊ शकते.
बुकिंग
या कारची बुकींग 3 सप्टेंबरला सुरू झाली आहे. तर या बुकिंगसाठी ग्राहकाला 21 हजार रुपये मोजावे लागतील.
डिजाइन
मारूती सियाजमध्ये रेअर केबिन खुपच आरामदायक असेल. तर मारूतीने
आपल्या या गाडीला थोडा वेगळा आणि नवा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.
पॉवर
मारूती सियाजच्या पेट्रोल मॉडेलमध्ये 1.4 लीटर के-सीरीज इंजिन देण्यात आले आहे. यामुळे 95 PS चे पॉवर आणि 130 NM चे टॉर्क मिळते. हे इंजिन 1400 सीसीचे असेल. तसेच दुसरीकडे डीझेल इंजिनच्या सियाजमध्ये 1.3 लीटर मल्टिजेट इंजिन लावले आहे. यामुळे 90PS ची पॉवर आणि 200NM चे टॉर्क मिळते. हे इंजिन 1300 सीसीचे असेल.
पुढील स्लाईडवर पाहा, सियाजच्या आतील फोटो...