Home | Business | Auto | maruti company workers on strike

मारुतीत संप सुरूच, 210 कोटीं नुकसान

agency | Update - Jun 10, 2011, 01:25 PM IST

मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या मानेसर येथील कारखान्यातील कामगारांचा संप सलग सहाव्या दिवशीही सुरूच राहिल्याने कंपनीचे 210 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • maruti company workers on strike

    मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या मानेसर येथील कारखान्यातील कामगारांचा संप सलग सहाव्या दिवशीही सुरूच राहिल्याने कंपनीचे 210 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परिस्थिती कालच्या प्रमाणेच असून उत्पादन ठप्प असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. मारुती सुझुकी एम्पलॉईज युनियन या नव्या कामगार संघटनेला मान्यता देण्याची मानेसर येथील कामगारांची मागणी आहे. दरम्यान मानेसर-गुरगाव औद्योगिक पट्टय़ातील सुमारे 1000 कामगारांनी गुरुवारी मानेसर येथे सत्याग्रह करून कामगारांच्या संपाला पाठिंबा दर्शविला.

    कामगार मंत्रालय सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे,हा वाद लवकर मिटावा यासाठी प्रयत्न चालू असल्याचे हरियाणाचे उद्योगमंत्री सुरजेवाला यांनी सांगितले.

Trending