आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- इंधन दरवाढीचा फटका मोटार निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी इंडियालाही बसला आहे. विक्री घसरल्यामुळे आता मारुतीने सर्वाधिक विक्री होणार्या अल्टो मोटारीसह पेट्रोलवर चालणार्या अन्य काही मोटारींच्या उत्पादनाला सध्या कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मोटार बाजारपेठेत मरगळ असल्यामुळे या दिवसांमध्ये पेट्रोलवर चालणार्या मोटारींची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे मोटारींचा अतिरिक्त साठा करण्यात अर्थ नाही त्यामुळे पेट्रोलवर चालणार्या मोटारींच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कंपनीच्या विपणन आणि विक्री विभागाचे व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी मयंक पारिक यांनी सांगितले.
साठा वाढत चालल्यामुळे मारुती सुझुकीने अलीकडेच अल्टो, एम 800, ए- स्टार, एस्टिलो आणि ओम्नी या मोटारींचे उत्पादन तीन दिवसांसाठी थांबवले आहे. साधारणपणे तीन आठवड्यांपर्यंतचा साठा ठेवण्यात येतो. पेट्रोल मोटारींचा विचार करायचा, तर या मोटारींचा साडेचार आठवड्यांचा साठा शिल्लक असल्याचे पारिक यांनी सांगितले; परंतु त्याची नेमकी आकडेवारी देणे त्यांनी टाळले.
मारुतीने 25 ते 26 मे दरम्यान आपल्या गुरगाव प्रकल्पातील पेट्रोल मोटारींचे उत्पादन थांबवले असून आता गुरगाव प्रकल्पातील कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. कंपनीने या तीन दिवसांमध्ये पेट्रोल मोटारींची आठ ते साडेआठ जार कपात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सलग चार महिने चढता आलेख कायम राखल्यानंतर मे महिन्यात पहिल्यांदाच कंपनीच्या विक्रीमध्ये घसरण झाली. पेट्रोलवर चालणार्या लहान मोटारींची विक्री घसरल्यामुळे कंपनीच्या एकूण विक्रीत 4.99 टक्क्यांनी घसरण होऊन ती 98,84 मोटारींवर आली.
एम 800, ए स्टार , अल्टो आणि वॅगन आर या लहान मोटारींची विक्री मे महिन्यात 29.03 टक्क्यांनी घसरून अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 42,125 मोटारींवरून 29,895 मोटारींवर आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.