आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti, Hundya And Mahindra's Motor Sell Increases

मारुती, ह्युंदाई व महिंद्राच्या मोटार विक्रीत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन उद्योग सध्या अवघड वळणावर असला तरी मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा या कंपन्यांनी मात्र जानेवारी महिन्यातील आपल्या मोटार विक्रीमध्ये चांगली वाढ नोंदवली आहे. परंतु टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर, जनरल मोटर्स आणि फोर्ड इंडिया यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात काहीशी खराब ठरली आहे.
व्याजाचे चढे दर, इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि त्यातच अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे नोक-यांना कात्री लागण्याची भीती यामुळे ग्राहकांनी मोटार खरेदी लांबणीवर टाकणे पसंत केले आहे. याचा फटका मोटार कंपन्यांना बसत आहे. परंतु रिझर्व्ह बॅँकेने या आठवड्यात रेपो आणि सीआरआरमध्ये केलेल्या पाव टक्क्यांच्या अल्पशा व्याजदर कपातीमुळे मोटार कंपन्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. व्यावसायिक बॅँकांनी व्याजदर कमी केल्यास वाहनांची मागणी वाढेल असा सूर मोटार कंपन्या आळवत आहेत. त्यातून जवळ आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तमंत्री पी. चिदंबरम वाहन उद्योगासाठी काही चांगल्या घोषणा करतील अशीदेखील आशा या कंपन्यांना आहे.रिझर्व्ह बॅँकेच्या व्याजदर कपातीमुळे बाजाराला सकारात्मक दिशा मिळाली आहे. परंतु जर वृद्धिधिष्ठित अर्थसंकल्प जाहीर झाला तर दुस-या तिमाहीत वाहन बाजारात सुधारणा होण्याची शक्यता जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष पी. बालेंद्रन यांनी व्यक्त केली.

जानेवारीतील वाहन विक्रीत टाटा मोटर्स
मोटार कंपनी जानेवारी 2011 जानेवारी 2012 वाढ (%)
मारुती सुझुकी इंडिया 1,01,047 1,03,026 1.96
ह्युंदाई मोटर इंडिया लि. 33,900 34,302 1.19
महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा 19,975 26,555 32.94
होंडा कार्स इंडिया 1,784 5,451 तीनपट
टाटा मोटर्स 34,669 15,209 - 56.13
टोयोटा किर्लोस्कर 17,395 13,329 23.37
जनरल मोटर्स 8,241 7,588 - 7.92
फोर्ड इंडिया 9,137 6,062 -33.65
रेनॉल्ट इंडिया 885 4,914 पाचपट
दुचाकींची विक्री कामगिरी
कंपनी जानेवारी 2011 जानेवारी 2012 वाढ (%)
होंडा मोटरसायकल 1,89,353 2,30,304 21.63

अ‍ॅँड स्कूटर्स
इंडिया यामाहा मोटर 26,300 29,785 13.25
सुझुकी मोटरसायकल 35,099 39,982 13.91