आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Launched Its Celerio Car In Auto Expo 2014

\'MARUTI CELERIO\'च्या रुपात भारतात धावणार पहिली ऑटोमॅटीक कार, वाचा वैशिष्ट्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा- 'ऑटो एक्‍सपो 2014'च्या दुसर्‍या दिवशी अर्थात आज (गुरुवारी) मारुतीने आपली बहुचर्चित आणि कार 'सेलेरियो' लॉन्च केली. सेलेरियोच्या रुपात भारत पहिल‍ी ऑटोमॅटीक कार धावणार आहे. त्यात मॅनुअली गेअर बदलण्याची गरज पडणार नाही. यात ऑटोमॅटीक गेअर बॉक्‍स आहे. सेलेरियोचे 6 पेट्रोल व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्‍यात आली आहे. या ऑटोमॅटीक कारची किंमत 3.9 लाख रुपयांपासून 4.59 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

'सेलेरियो' कारचे प्रति लीटर 23.1 किमी मायलेज आहे. उल्लेखनिय म्हणजे ही कार सप्तरंगात सादर करण्‍यात आली आहे. यात सनशाइन रे, फेरुलिन ब्लू, केव्ह ब्लॅक, ब्लेजिंग रेड, पर्ल व्हाइट, सिल्की सिल्वर, ग्रे या रंगांचा समावेश आहे. 'सेलेरियो' ही कार चार व्हर्जनमध्ये सादर झाली आहे. त्यात Lxi, Vxi, Zxi आणि Zxi optional आहे.

'सेलेरियो'मधील खास वैशिष्ट्य म्हणजे दुर्घटना होण्यापूर्वी गाडीत अलर्ट अलार्म वाजतो. तसेच दुर्घटना झाल्यानंतर कारचे दरवाजे ऑटोमॅटीक अनलॉक होतात.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कारमधील लेटेस्ट फीचर्स आणि किंमत...