नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकीने अल्टोची पुढील पिढीची अल्टो के-१० ही लहान कार सादर केली. ग्राहकांना पैशांचा पुरेपूर फायदा देणा-या फ्युचरिस्टिक तंत्रामुळे नवी अल्टो के-१० ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असे मत कंपनीचे एमडी व सीईओ केनेची आयुकावा यांनी व्यक्त केले.
नव्या के-१० ची वैशिष्ट्ये
* जुन्या अल्टोपेक्षा नव्या के-१० चे मायलेज १५ टक्क्यांनी जास्त
* ऑटो गिअर शिफ्टिंग सुविधा (हाय एंड मॉडेलमध्ये)
* नव्या के -१० साठी कंपनीने २०० कोटींची गुंतवणूक केली आहे.
नव्या के-१० च्या किमती
* मॅन्युअल पेट्रोल - ३.०६ लाख ते ३.५६ लाख रुपये
* ऑटो गिअर शिफ्ट - ३.८० लाख रुपये
* सीएनजी मॉडेल - ३.८२ लाख रुपये
* (सर्व किमती एक्स शोरूम दिल्ली )