आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Launches 5 Star Rating Car Which Has Passed Crash Test As Well

Auto Expo: मारुतीने लॉन्च केली 5-स्टार रेटिंग कार, क्रॅश टेस्टही केली पास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो एक्स्पोमध्ये लॉन्च झालेली मारुती SX4 S-CrossSX4 ही कार हॅचबॅकचे अपग्रेटेड व्हर्जन आहे. जिनेव्हामध्ये झालेल्या मोटार शोमध्ये या कारविषयी माहिती सांगण्यात आली होती. Euro NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5 स्टार मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे. S-Crossमध्ये डिझेल आणि पेट्रोल असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 1.6 लिटर पेट्रोल मोटर आउटपुट 6000rpm आहे. जे 120PS पॉवर देते आणि 4,400rpm वर 156 न्यूटन मीटर पॉवर मिळते.

पेट्रोल मोटार कारमध्ये 5- स्पिड मॅन्यअल ट्रान्समिशन आणि CVT गिअर बॉक्स आहे जे 2WD मॉडेलमध्ये समोरच्या व्हिलला पॉवर देते तर AMDमॉडेलमध्ये चार व्हिलसना पॉवर देते. याचे डिझेल इंजिन 1.6 लीटर मल्टीजेट आहे जे 3,750rpm वर 120PS पॉवर देते आणि 1,750rpm वर 320 न्यूटन मीटर पॉवर देते. याच्या 2WD आणि 4WD या दोन्ही मॉडेलमध्ये ६-स्पिड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. या कारची किंमत नेमकी किती असणार आहे हे कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही.


या कारच्या लॉन्चिंगचे काही खास फोटो पाहा पुढील स्लाइडवर...