आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Mahindra Motor India Reduced The Price Of Its Cars By 4 6 Percent

मारुती, ह्युंदाई, महिंद्राच्या कार, हीरोच्या बाइक स्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हंगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी वाहनांवरील उत्पादन शुल्कात कपातीची घोषणा केली होती. परिणामी वाहन कंपन्यांनी वाहनांच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठ्या कार निर्मात्या कंपन्या मारुती-सुझुकी, ह्युंदाई इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि
फियाट या कंपन्यांनी कारच्या किमती कमी केल्या आहेत. हीरो मोटोकॉर्प, होंडा स्कूटरने मोटारसायकलच्या किमतीत कपात केली आहे.
मारुती सुझुकीच्या पत्रकानुसार, उत्पादन शुल्कातील कपातीचा संपूर्ण लाभ ग्राहकांना देण्याचे कंपनीने ठरवले आहे. कंपनीच्या सर्व मॉडेल्सवर ही किंमत कपात राहील व कार 8,502 ते 30,984 रुपयांनी स्वस्त होतील. ह्युंदाईने कंपनीच्या ई-ऑन ते सँटा एफई अशा सर्व मॉडेलच्या किमतीत कपात करण्यात आल्याचे ह्युंदाईचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले. ते म्हणाले, उत्पादन शुल्क कपातीमुळे कारच्या किमतीत घट करणे योग्य असून ग्राहकांसाठी कार वाजवी किमतीत उपलब्ध होतील. कंपनीच्या कारच्या किमती मॉडेलनिहाय 10,000 ते 1,35,300 रुपयांनी कमी होतील. महिंद्राच्या कार मॉडेलनिहाय 13 ते 49 हजारांनी तर फियाटच्या कार आठ ते 12 हजारांनी स्वस्त झाल्या आहेत. महिंद्रांची रेक्सटॅन एसयूव्ही 92,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. फोक्सवॅगन कंपनीने पोलो कारची किमत 18 हजार ते 31 हजार रुपयांनी तर व्हेन्टो सेडान कारची किमत 14,500 ते 27000 हजार रुपयांनी कमी केली आहे. होंडा कारने कारच्या किमती मॉडेलनिहाय 44,741 रुपयांपर्यंत घटवल्या आहेत.
मोटारसायकल स्वस्त
हीरो मोटोकॉर्पने बाइकच्या किमती दोन ते पाच टक्क्यांपर्यंत कमी घटवल्या आहेत. यामुळे मोटारसायकल 4500 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर कंपनीनेही दुचाकीच्या किमती 7,500 रुपयांपर्यंत घटवल्या आहेत. होंडाची ड्रीम नियो मोटारसायकल 1600 रुपयांनी, तर सीबीआर 250 आरची किमती 7600 रुपयांनी कमी होईल.
मारुती मॉडेलनिहाय किमतीतील घट (रुपयात)
अल्टो : 8,502, अल्टो के 10 : 11034 रुपये, ओम्नी : 8,698, सेलेरियो : 13,615, इको : 10,881, वॅगन आर : 12,578, ए-स्टार : 13,482, इस्टिलो : 12,148, रिट्झ : 15,130, स्विफ्ट 15,874, डिझायर : 17,884, अर्टिगा : 18,747, एसएक्स4 :16,618 ते 30,984 रुपये.
पुढील स्लाइडमध्ये, कार, बाइकच्या किमतीत किती घट