आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुतीपाठोपाठ महिंद्रालाही मंदीचा ‘ब्रेक’, उत्पादन आठ दिवस बंद राहणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑटो क्षेत्राच्या क्षितिजावर मंदीचे ढग दाट झाले असून मारुती-सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांनी उत्पादनाला ब्रेक देत परिस्थितीचे संकेत दिले आहेत. महिंद्रा कंपनीने जुलैमध्ये आठ दिवस उत्पादन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


मारुतीने मनेसर प्रकल्पातील 200 कंत्राटी कामगारांना सुटीवर जाण्यास सांगितले आहे. देखभालीचे कारण देत कंपनीने जूनमध्ये डिझेल यंत्र निर्मिती आठवडाभर बंद ठेवली होती.


तथापि, या निर्णयाचा उत्पादन आणि कामगार कपातीवर कोणताही परिणाम होणार नाही. बाजारात वाहन उपलब्धतेतही अडचण येणार नाही, असे महिंद्राने स्पष्ट केले आहे. महिंद्राचे नाशिक व हरिद्वार येथे प्रकल्प आहेत. महिंद्राची चाकण येथील उपकंपनीही आठ दिवस ‘बिगर उत्पादन दिवस’ पाळणार आहे.
महागडी कर्जे, विक्रीतील घट कारण
कंपन्यांसमोरील अडचणी :
०महागडे कर्ज ०रुपयाचे अवमूल्यन
०आयात महागली ०विक्रीत झालेली घट
०सुट्या भागांचा वाढता खर्च


रेटिंगलाही फटका बसणार :
०भारतीय ऑटो क्षेत्राचे पतमानांकन यंदा नकारात्मक राहील, असे इंडिया रेटिंग या संस्थेने म्हटले आहे. मागील सहा वर्षांत पहिल्यांदाच वाहन क्षेत्राच्या रेटिंगला हा फटका बसणार आहे.
वाहन क्षेत्राची कोंडी : महागडे कर्ज आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे वाहन कंपन्या जेरीस आल्या. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने चिंतेत भर पडली. वाहनांच्या किमती कमी कराव्यात तर रुपया घसरल्याने सुट्या भागांची महागाई आहेच, अशा कोंडीत वाहन क्षेत्र आहे.