आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मारुती’ची गुजरातेत कोटींची उड्डाणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी गुजरातमध्ये 4 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून मेहसाणाजवळ 700 एकर क्षेत्रात नवा कारखाना थाटण्यात येणार आहे. 2015-16 मध्ये या कारखान्यातून उत्पादनास प्रारंभ होणार आहे. मारुतीचा हरियाणाबाहेरील हा सर्वात मोठा प्रकल्प राहील.
मारुतीने म्हटले आहे की, येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची आमची योजना आहे. मेहसाणाजवळ 700 एकरांवर आकारास येणाºया या प्रकल्पाची क्षमता वर्षाकाठी 2.5 वाहन निर्मितीची आहे. यासाठी आम्ही 4 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहोत. याशिवाय मारुतीचे व्हेंडर्स तसेच इतर पुरवठादारही येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. 1983 मध्ये हरियाणात मारुती आली. त्यानंतर हरियाणाबाहेर होणारी ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
गुजरातवर कंपन्या फिदा : गेल्या काही दिवसांत गुजरातला प्राधान्य देणारी मारुती तिसरी कंपनी आहे. याआधी टाटा मोटर्सने साणंद येथे नॅनोसाठी प्रकल्प उभारला. त्यानंतर फोर्डने त्यांच्या प्रकल्पासाठी गुजरातचीच निवड केली.
2000 जणांना रोजगार
मारुती-सुझुकीच्या मेहसाणा येथील उत्पादन प्रकल्पामुळे 2000 जणांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय या प्रकल्पासाठी येणाºया मारुतीच्या विविध पुरवठादारांमुळे हजारो जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 31 मार्च 2012 च्या आकडेवारीनुसार मारुती-सुझुकी कंपनीत 9148 कर्मचारी-अधिकारी कार्यरत आहेत.
कार उत्पादनाला ब्रेक ; मारुती लवकरच करणार उत्पादनात कपात
मारुती-सुझुकी देणार आता सीएनजी मॉडेल्सवर भर...
मारुती सुझुकीची नवी एसयूव्ही लवकरच