आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात प्रकल्पासाठी मारुती घेणार अल्प भागधारकांकडून परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वादग्रस्त गुजरात प्रकल्पासाठी अल्प भागधारकांकडून मान्यता घेण्याचा निर्णय मारुती सुझुकीने घेतला आहे. पालक कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने हा प्रकल्प मारुती सुझुकीकडून ताब्यात घेण्याचे ठरवले आहे.

सुझुकी मोटार कॉर्पोरेशनने 30.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 2017 पर्यंत गुजरातमध्ये मोटार प्रकल्प उभारण्याचा मानस जानेवारीत जाहीर केला होता. हा प्रकल्प उभारण्याचा मूळ प्रस्ताव मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या उपकंपनीचा होता. पालक कंपनी या प्रकल्पात सुझुकी मोटार गुजरात या पूर्णत: अंगीकृत असलेल्या विभागाच्या मार्फत गुंतवणूक करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जपानच्या कंपनीचा पूर्ण मालकीचा असेल आणि त्याची वर्षाला 100,000 मोटारींचे उत्पादन करण्याची क्षमता असेल.

चार तास चालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अल्प भागधारकांची मान्यता घेण्याचा निर्णय झाला. या बैठकीला पालक कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ओसामू सुझुकी उपस्थित होते.

अल्प भागधारकांची मंजुरी घेणे कायद्यानुसार आवश्यक नाही; परंतु कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून संचालक मंडळाने ही निर्णय घेतल्याचे मारुती सुझुकी इंडिया लि.चे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

मारुतीच्या अल्प भागधारकांचे प्रमाण तीनचतुर्थांश असून कंपनीत त्यांचे 44 टक्के भांडवल आहे. एका विशिष्ट ठरावाच्या माध्यमातून हे भागधारक कंपनीच्या प्रस्तावाला मान्यता देतील.