आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भारतातील सर्वांत मोठी कार निर्माती कंपनी 'मारुती सुझुकी इंडिया'ने स्वीफ्ट आणि एर्टिगामध्ये दोषपूर्ण पार्ट आढळून आल्याने विक्री झालेल्या कार परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी सुमारे एक लाख डिझायर कार परत बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. इंधन टाकीला जोडलेल्या पाईपमध्ये (फ्युअल नेक फिलर) दोष आहे. त्यामुळे ऑईल गळती, इंधनाची दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहे.
मारुती सुझुकी कंपनीने विक्री केलेल्या 47, 237 स्वीफ्ट व 13593 एर्टिगा कार परत बोलावल्या आहेत. यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मॉडेलचा समावेश आहे. 12 नोव्हेंबर 2013 ते 4 फेब्रुवारी 2014 या काळात निर्मिती झालेल्या कारमधील दोषपूर्ण पार्ट बदलून दिला जाणार आहे. पार्ट बदलून देण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे मारुती कंपनीला हा पार्ट जेबीएमतर्फे पुरवठा केला जातो. जेबीएममध्ये मारुतीची 29.28 टक्के भागिदारी आहे. मारुती स्वीफ्ट, डिझायर आणि एर्टिंगा कारमध्ये दोषपूर्ण पार्ट अवसल्याचे जेबीएमला सूचित करण्यात आले आहे.
यापूर्वी नोव्हेंबर 2013 मध्ये 1492 डिझायर, स्वीफ्ट, एर्टिगा आणि ए-स्टार कार परत बोलावल्या होत्या. यावेळी कारमधील स्टेअरिंग कॉलम बदलून देण्यात आला होता.
दरम्यान, मारुती सुझुकीने 2010 मध्ये सुमारे एक लाखाहून अधिक 'ए-स्टार' कार परत बोलावण्यात आल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.