आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी योजना: मारुतीची एसयूव्ही लवकरच, एलसीव्ही आणण्याचीही तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातीलसर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने दरवर्षी ३० लाख कार विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी कंपनीने आपल्या कारच्या मॉडेलची संख्या वाढवून दुप्पट म्हणजे २५ करण्याची योजना आखली आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये कंपनीने ११.६ लाख कारची विक्री केली होती. कंपनीचे चेअरमन आर.सी. भार्गव यांनी ही माहिती दिली.

मारुती सुझुकी आता हलकी व्यावसायिक वाहने (एलसीव्ही) बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. याची क्षमता एक टनाची राहील. टाटा एस, महिंद्रा जिओ आणि अशोक लिलँडच्या दोस्तला हे वाहन टक्कर देईल. हे मारुतीचे पहिले व्यावसायिक वाहन राहील. यासाठी विक्री सेवा यासाठी वेगळा विभाग राहील.

यांनी सांगितले, वर्षाकाठी ३० लाख कार ब्रिक्रीसाठी कंपनीला विमान २५ मॉडेलची गरज भासणार आहे. केवळ १२ ते १५ मॉडेल असताना हे लक्ष्य गाठणे कठीण आहे. सर्व श्रेणीत उपस्थिती असणे त्यासाठी आवश्यक असून मागच्या वर्षी मारुतीची बाजारातील हिस्सेदारी ३८.९ टक्के होती. यंदा आतापर्यंत हे प्रमाण ४४.४ टक्के आहे. एकूण बाजारपेठेच्या केवळ ८० टक्क्यांपैकी आहे. कारण कार बाजारातील एसयूव्ही श्रेणीत मारुतीची सध्या उपस्थिती नाही.

ईस्टरआणि इकोस्पोर्टच्या स्पर्धेसाठी एसयूव्ही भार्गवयांनी सांगितले, रेनॉ डस्टरच्या स्पर्धेसाठी मारुती काही महिन्यांतच स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) बाजारात आणणार आहे. याशिवाय आणखी एक एसयूव्ही २०१६ मध्ये सादर होणार असून ती फोर्डच्या इकोस्पोर्टशी स्पर्धा करणार आहे. ही कार चार मीटरपेक्षा कमी लांबीची राहील. मारुतीसाठी ही नवी श्रेणी असून दोन्ही एसयूव्ही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हर्जनमध्ये उपलब्ध राहतील. एसएक्स-४ च्या जागी मध्यम आकाराची सेडान सियाज लवकरच सादर होणार आहे. भार्गव यांच्या मते सियाज कार होंडा सिटी श्रेणीची कार राहील.