आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मारुती’चे उड्डाण: सर्वोत्तम विक्रीत अल्टो अव्वल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विक्रीमध्ये फटका सहन करावा लागत असला तरी कारनिर्मितीत आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी इंडियाच्या पाच कारने एप्रिलमध्ये विक्री झालेल्या सर्वोत्तम 10 कारमध्ये स्थान पटकावले आहे. यामुळे मारुतीचे भारतीय बाजारपेठेत स्थान आणखी बळकट झाले आहे. गेल्या वर्षात याच कालावधीत मारुतीच्या चार कारने या क्रमवारीत स्थान मिळवले होते.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम) या संस्थेने अलीकडेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दहा अव्वल सर्वोत्तम विक्री होणार्‍या वाहनांमध्ये मारुती अल्टोने सर्वात वरचे स्थान कायम ठेवले आहे. गेल्या वर्षातल्या एप्रिल महिन्यातील 19,847 मोटारीच्या तुलनेत 16,763 अल्टो मोटारींची विक्री कंपनीने केली आहे.

क्रमवारीतील अन्य मोटारी : सेलेरियो ( क्र. 9), होंडा सेडान (6), एक्सेंट (7), इऑन (8), एचएमआयएल हॅचबॅक आय 20 (10)

एसयूव्हीमध्ये बोलेरो अव्वल
उपयोगिता व एसयूव्ही वाहनांच्या प्रकारांमध्ये महिंद्राच्या बोलेरोने एप्रिल महिन्यात 8942 एसयूव्हींची विक्री करून अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल अर्टिगा, फोर्ड इकोस्पोर्ट, इनोव्हा यांचा क्रमांक लागतो.

अव्वल चार मोटारी विक्री एप्रिल 2013 विक्री एप्रिल 2014
1.मारुती अल्टो 19,847 16,763,
2.डिझायर 19,446 16,008
3.स्विफ्ट 16, 531 15,874
4.वॅगन आर 9,612 12,794
5.ह्युंदाई ग्रॅँड आय -- 9,612