नवी दिल्ली- तुम्ही नव्या वर्षात नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हा विचार तुम्हाला डिसेंबर महिन्यात अंमलात आणावा लागेल. कारण नव्या वर्षात कारच्या किमती वाढणार आहे. बहुतांश कार निर्मात्या कंपन्यांनी
आपल्या उत्पादनाच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
काही कंपन्यां आपल्या ठरावीक उत्पादनावर एक लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इन्शुरन्स आणि रजिस्ट्रेशन शुल्कही माफ केले आहे.
देशातील सगळ्यात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनेही एक जानेवारी 2015 पासून आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. तसेच लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने पाच टक्के तर जनरल मोटर्सने एक टक्का दर वाढवण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. यामुळे नव्या वर्षात कारच्या किंमतीत 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे.
पुढे वाचा, कार कंपन्यांची Year End ऑफर...
मारुती सुझुकी
मारुती रिट्ज: 75,000 रुपयांपर्यंत डिसकाउंट
स्विफ्ट: 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
ऑल्टो K10 : 15,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
सेलेरियो : 15,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, कोण कोणत्या कार महागणार
(टीप: या ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, फ्री इन्शुरन्स आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.)