आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुकावा मारुतीचे नवे एमडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकीच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओपदी केनिचि आयुकावा यांची नियुक्ती करण्यात आली. ते शिंजो नाकानिशी यांच्याकडून पदभार स्वीकारतील. एक एप्रिलपासून आयुकावा ही जबाबदारी सांभाळणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. मारुती-सुझुकी कंपनीच्या संचालक मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नाकानिशी निवृत्त होत आहेत. नाकानिशी यांनी 2007 पासून भारतीय मारुतीशी संबंिधत आहेत. सप्टेंबर 2010 मध्ये त्यांनी मारुतीची सूत्रे हाती घेतली.