आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki Cars In India New Campaign For Sale

मारुती-सुझुकीचा नवा नारा ‘खेड्यांकडे चला’, मार्चपर्यंत एक लाख खेड्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाहन उद्योगातील मंदीमुळे विक्रीची वाट बिकट झाल्याने वाहन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने आता आपल्या मोटारी ग्रामीण बाजारपेठेच्या मार्गावर वळवण्याचा विचार केला आहे. विक्रीला बळकटी देण्यासाठी कंपनीने मार्च महिन्यापर्यंत एक लाख खेडेगावांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प सोडला आहे.
मारुतीने पाच वर्षांपूर्वीच ग्रामीण बाजारपेठ काबीज करण्याची योजना आखली होती. आता पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत देशभरातील एक लाख खेड्यांमध्ये आपले स्थान भक्कम करण्याचे ठरवले आहे.
यंदाच्या वर्षात वाहन उद्योगाची विक्री जवळपास 4 ते 5 टक्क्यांनी घटली; परंतु दुसर्‍या बाजूला ग्रामीण भागातील विक्रीचे प्रमाण हे एकूण विक्रीच्या तुलनेत 30 टक्के आहे. त्यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत कंपनीने 18 टक्के वाढीची नोंद केल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर.सी. भार्गव यांनी सांगितले. शहरातील मागणीत घट झाल्यामुळे कंपनीने आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे.