आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki Ciaz To Be Launched In India Today

मारुती सुझुकीने लॉन्च केली Ciaz, किमत 6.99 लाख, जाणून घ्या स्मार्ट फीचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: Maruti Ciaz)

नवी दिल्‍ली- देशातील सगळ्यात मोठी कार निर्माता कंपनी 'मारुती सुझुकी'ने आज (सोमवार) आपली बहुप्रतीक्षित कार 'सियाझ' (Ciaz) भारतीय बाजारात लॉन्‍च केली. मारुतीची सियाझ कार पेट्रोल मॉडेलची किमत 6.99 लाख (एक्‍स शोरूम) असून डिझेल मॉडेलची किमत 8.04 लाख रुपये आहे.

पेट्रोल व्हेरियंट...
VXi - 6.99 लाख
VXi+ - 7.55 लाख
ZXi - 8.24 लाख
ZXi (O) - 8.59 लाख
VXi AT - 8.65 लाख
ZXi AT - 9.34 लाख

डिझेल व्हेरियंट...
VDi - 8.04 लाख
VDi+ - 8.63 लाख
ZDi - 9.45 लाख
ZDi (O) -9.80 लाख

मायलेज...
Ciaz कारचे डिझेल मॉडेल 26.3km/l तर पेट्रोल मॉडेल 20.73km/l चे मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. मारुतीची ही कार होंडा सिटीला टक्कर देण्याची शक्यता आहे.
गेल्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीत झालेल्या ऑटो एक्‍स्‍पोमध्ये मारुतीने पहिल्यादा ही कार सादर केली होती.

इंजिनचे वैशिष्ट्ये..
सियाज कार पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन्ही मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. यात सुझुकीचे k सीरीज इंजिन बसवले आहे. इंजिनमध्ये 5 स्‍पीड गिअरबॉक्‍सशिवाय ऑटोमॉटिक पर्याय उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिन 1.4-litre चे असून त्याची क्षमता 91bhp पॉवर तसेच डिझेल इंजिन 1.3-litreचे असून ते 89bhp ची पॉवर निर्माण करते.
सियाज कार ही कॉम्पिटिटर 'होंडा सिटी' अथवा ह्युंदाई 'वर्ना' पेक्षा लांब आहे. सियाज कारची मागील सीट एसएक्‍स 4 च्या तुलनेत जास्त आरामदायी आहे. मारुतीच्या या सेडान मॉडेलमध्ये प्रोजेक्‍टर हॅडलॅंप शिवाय 16 इंचाचा मल्‍टी स्‍पोक एलॉय व्हील्स आहे. याशिवाय कारमध्ये 7 इंचाचा टचस्‍क्रीन असलेला स्‍मार्टप्‍ले इन्‍फोटेनमेंट सिस्‍टम देण्यात आला आहे. फुल्ली ऑटोमॅटिक एसी, रिअर एसी वेंटसारखे अन्य फीचर्स देण्यात आले आहे. इंजिन स्‍टार्ट बटन, मल्‍टी फंक्‍शन स्‍टीअरिंग व्हील्स, एसी विद क्‍लायमेट कंट्रोल, कूल्‍ड ग्‍लोव्ह बॉक्‍स, एबीएस आणि दोन एअरबॅग सहभागी आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मारुती सियाजच्या इंटीरिअर्सचे छायाचित्र...