आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki Dzire News In Marathi, Automobiles, Cars

मारुती 1 लाख डिझायर कार परत बोलवणार, दोषपूर्ण पार्ट दुरुस्तीसाठी घेतला निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतातील सर्वांत मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी तब्बल एक लाख कॅम्पॅक्ट सेदान डिझायर कार परत बोलवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तेलाच्या टाकीतील दोषपूर्ण पार्ट बदलण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.
देशभरातील डिलर्सकडे असलेल्या डिझायर कारमधील तेलाच्या टाकीतील दोषपूर्ण फ्युअल नेक फिलर मारुती सुझुकीकडून बदलून देण्यात येत आहे. यासंदर्भात कंपनीकडून पावले उचलण्यात आली असल्याचे दिसून येते. परंतु, अद्याप कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या वृत्ताचे खंडन केले नाही की हे वृत्त सत्य असल्याचे सांगितलेले नाही.
डिलर्सकडे असलेल्या डिझायर कारमधील फ्युअल नेक फिलर बदलण्यात येत असले तरी या कार कोणत्या वर्षांत तयार करण्यात आल्या आहेत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या दोषपूर्ण पार्टचा फटका सुमारे एक लाख कारला बसू शकतो, अशी माहिती कार निर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.
कंपनीने 2013-14 या वर्षात 1,97,685 डिझायर कार विकल्या आहेत. एकट्या मार्च महिन्यात 17,237 डिझायर कार विकण्यात आल्या आहेत. दरम्यान, दोषपूर्ण पार्ट बदलून देण्यासंदर्भात बोलण्यास मारुती सुझुकीच्या प्रवक्त्याने नकार दिला आहे.