आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki Launched Siyaz Sedan, Divya Marathi

मारुती सियाझ सेडान देणार होंडा सिटी, व्हेर्नाला टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘एसएक्स ४’ ला ग्राहकांकडून फारशी पसंती न मिळूनही वाहन निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकीने नवी कोरी ‘सियाझ’ सेडान बाजारात दाखल करून ती कसर भरून काढली आहे. जवळपास सात वर्षांनी बाजारात आलेली मारुतीची ही पहिली सेडान असून त थेट ह्युंदाई आणि होंडाला टक्कर देणार आहे.

मारुतीने एक्सएक्स ४ सेडान २००७ मध्ये पहिल्यांदा बाजारात दाखल केली. परंतु होंडा मोटर आणि ह्युंदाई मोटर यांच्या स्पर्धेत एसएक्स ४ ला पाहिजे तसे यश मिळाले नाही. परिणामी मार्चअखेर संपलेल्या आिर्थक वर्षात एसएक्स ४च्या िवक्रीत जवळपास ४० टक्क्यांनी घट झाली.

भारत ही जगातील सहावी सर्वात माेठी माेटार बाजारपेठ म्हणून आेळखली जाते. परंतु महागाई आिण चढ्या व्याजदरामुळे ग्राहकांनी सेडान खरेदीपासून थाेडे लांबच राहण्याचे ठरवले. त्यामुळे गेल्या वर्षातल्या २,००,१७६ सेडान िवक्रीच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात मध्यम आकाराच्या सेडानची एकूणच िवक्री २३ टक्क्यांनी घसरून ती १,५५,०८९ वर आली.

गेल्या अनेक वर्षांपासून लाखाे ग्राहकांनी मारुती माेटारींचा आनंद लुटला आहे. या ग्राहकांना िसयाझ या आणखी एका नव्या मध्यम आकाराच्या सेडानचा आनंद िमळणार आहे. हे करताना आम्ही केवळ माेटारींचाच नव्हे तर आमच्या िवक्रीचाही दर्जा उंचावला आहे. पुढील वर्षात ६० ते ८० हजार ‘िसयाझ’ माेटारींची िवक्री करण्याचे लक्ष्य डाेळ्यासमाेर ठेवले असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आिण मुख्य कार्यकारी अिधकारी केिनची आयुकावा यांनी अनावरणप्रसंगी बाेलताना सांिगतले.

िसयाझच्या उत्पादनासाठी ६२० काेटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून या उत्पादनामध्ये स्थािनकीकरणाचे प्रमाण ९८ टक्के आहे. भारतीय ग्राहकांच्या सेडानच्या गरजा लक्षात घेऊनच िसयाझचे उत्पादन करण्यात आल्याचे त्यांनी सांिगतले.
िसयाझच्या आगाऊ आरक्षणाला मागील महिन्यात सुरुवात झाली आिण आतापर्यंत एक हजार ग्राहकांनी बुिकंग केले आहे. अल्प प्रतिसाद लाभलेली एसएक्स ४ सेडानएेवजी आता िसयाझ सेडानच बाजारात िदसणार आहे.

िकमत : (एक्स शाेरूम, िदल्ली)
पेट्राेल िसयाझ
६.९९ लाख ते
९.३४ लाख रु.
िडझेल िसयाझ
८.०४ लाख ते
९.८ लाख रु.
अन्य सेडानच्या तुलनात्मक िकमती : हाेंडा िसटी - ७.१९ लाख ते ११.०५ लाख रु. ह्युंदाई व्हेर्ना - ७.३९ लाख रु. ते ११.७२ लाख रु.