आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki Launches Celerio Green For 4.68 Lakh Rupees

मारुतीची \'सेलेरिओ ग्रीन\' बाजारात दाखल; एक किलोमध्ये देईल 31.79 किमीचे मायलेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मारुती सुझुकी इंडियाने आपल्या कॉम्पॅक्ट कारच्या श्रेणीतील सीएनजीवर चालणारी ‘सेलेरिओ ग्रीन’ ही कार बाजारात उतरवली आहे. दिल्लीत या कारची किंमत 4.68 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. आदर्श परिस्थितीत ही कार एक किलोग्रॅम सीएनजीमध्ये 31.79 किलोमीटर मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे.

बिनागिअरची पहिली कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या कारमध्ये ‘आयजीपीआय’ टेक्नॉलॉजी असल्याने कार चालवणे आनंददायी ठरेल, असे कंपनीने म्हटले आहे. सध्या पेट्रोल सेलेरिओची किंमत 4.06 लाख आहे.

'मारुती'ने सध्या सेलेरियो ग्रीन VXi मॅन्युअल मॉडेल उपलब्ध करून दिले आहे. सेलेरियो ग्रीन बाय फ्यूल सीएनजी व्हेरिएंट कार आहे. त्यात IGPI टेक्नोलॉजी (इंटेलिजेंट गॅस पोर्ट इंजेक्शन) आहे.