एप्रिल पावला: मारुती / एप्रिल पावला: मारुती सुझुकी, एम अँड एम, होंडाच्या विक्रीत चांगली वाढ

प्रतिनिधी

May 03,2013 07:16:00 AM IST

मुंबई- वाहन बाजारातील सध्याच्या मरगळीच्या वातावरणामुळे मोटार कंपन्यांच्या विक्रीसाठी नवीन आर्थिक वर्ष काहीसे संमिश्र ठरले आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा कार्स आणि जनरल मोटर्स या आघाडीच्या कंपन्यांच्या मोटार विक्रीमध्ये एप्रिल महिन्यात चांगली वाढ झाली आहे; परंतु ह्युंदाई मोटर, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर, फोर्ड इंडिया यांच्या विक्रीचा ब्रेक मात्र फेल झाला आहे.

स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही 500, झायलो, बोलेरो आणि व्हेरिटो या वाहनांना चांगली मागणी आल्यामुळे महिंद्रा अँड महिंद्राच्या स्थानिक बाजारातील मोटार विक्रीत चांगली वाढ झाली आहे; परंतु टोयोटा किर्लोस्कर विक्रीत 37.36 टक्क्यांनी घट होऊन एप्रिल महिन्यात केवळ 9,007 मोटारींची विक्री होऊ शकली आहे.

शुल्कवाढीचा ‘एसयूव्ही’ला फटका
अबकारी शुल्कात वाढ करून ते 27 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर नेल्याचा ‘एसयूव्ही’ वाहनांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. या शुल्कवाढीमुळेच किमतीत वाढ करावी लागली. वित्त विधेयकातदेखील एसयूव्हींवरील तीन टक्के अतिरिक्त अबकारी शुल्क मागे न
घेतल्यामुळे पुन्हा एकदा निराशा झाली आहे. आता रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी होण्याची अपेक्षा असल्याचे मत महिंद्रा अँड महिंद्राच्या आॅटोमोटिव्ह विभागाचे सीईओ प्रवीण शहा यांनी व्यक्त केले.

सुधारणेचे संकेत
>वाहन बाजारातील तणावाचे वातावरण कायम आहे; परंतु पेट्रोल मोटारींच्या मागणीत वाढ होत असून त्यामुळे सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत.
-राकेश श्रीवास्तव, वरिष्ठ उपाध्यक्ष, विक्री आणि विपणन, ह्युंदाई मोटर इंडिया लि.

>वाहन बाजारात मंदीचे वातावरण असतानाही अलीकडेच बाजारात आलेल्या होंडा अमेझला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-जनेश्वर सेन, वरिष्ठ उपाध्यक्ष, विक्री, विपणन, होंडा कार्स इंडिया लि.

>कंपनी आणि वितरकांकडील इन्व्हेंटरी कमी करण्यासाठी आम्ही उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
- संदीप सिंग, उपव्यवस्थापकीय संचालक, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स

वाहन विक्रीचा सूर
मोटार कंपनी एप्रिल 2012 एप्रिल 2013 वाढ
हीरो मोटोकॉप 5,51,557 4,99,113 - 9.51 %
होंडा मोटरसायकल 1,98,831 2,59,560 + 30.54 %
टीव्हीएस मोटर कंपनी 1,51,181 1,42,794 - 5.55 %
यामाहा मोटर इंडिया 26,944 35,927 + 33.34 %
मोटार कंपनी एप्रिल 2012 एप्रिल 2013 वाढ
मारुती सुझुकी 90,255 90,523
ह्युंदाई मोटर 35,070 32,403 - 7.60 %
होंडा कार्स इंडिया 7,075 8,488 + 19.97 %
टाटा मोटर्स 22,658 11,570 - 48.94 %
महिंद्रा अँड महिंद्रा 20,554 20,748
टोयोटा किर्लोस्कर 14,378 9,007 37.36%
जनरल मोटर्स 8,005 8196 2.39%
फोर्ड इंडिया 7,201 4003 - 44.41 %
रेनॉ 615 6,314 दहापट

खरेदीचे प्रमाण कमी
बाजारात नव्याने आलेल्या शेव्हरोले सेल मोटारीला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे विक्रीत काही वाढ नोंदवता आली. आकर्षक विक्रीच्या आॅफर्स जाहीर करूनदेखील चौकशीचे रूपांतर खरेदीत होण्याचे प्रमाण कमी आहे. पी. बालेंद्रन, उपाध्यक्ष, जनरल मोटर्स इंडिया.

X
COMMENT