आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुतीची म्यूझिक एडिशन \'स्विफ्ट विंडसॉन्ग\', जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फिचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- मारुती सुझुकीची 'स्विफ्ट विंडसॉन्ग')
नवी दिल्ली- मारुती सुझुकी कंपनी पॉप्यूलर कार स्विफ्टचे एक हटके व्हर्जन घेऊन आली आहे. आतापर्यंत भारतात आलेल्या कारमध्ये हे अगदी वेगळे व्हर्जन आहे. याला लिमिटेड एडिशनवर सादर करण्यात आले आहे. कंपनीने याला 'स्विफ्ट विंडसॉन्ग' नावाने सादर केले आहे. याचे केवळ 100 युनिट्स तयार केले जाणार आहेत. याची किंमत सामान्य स्विफ्ट कारच्या तुलनेत 40-50 हजार रुपयांनी जास्त असणार आहे. मारुती स्विफ्ट कारची किंमत सध्या 4.42 ते 6.95 लाख रुपये आहे.
जाणून घ्या या कारचे आकर्षक फिचर्स
१- या कारला व्हाईट कलर आणि म्युझिक ग्राफिक्ससोबत सादर करण्यात आले आहे. यामुळे ही खुप बोल्ड आणि आकर्षक दिसते.

२- पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरायंटमध्ये ही सादर केली जाणार आहे. ही कार 1.2-litre K-Series VVT पेट्रोल इंजिनसह 20.4 प्रति किलोमीटर मायलेज देते.
३- डिझेल कारमध्ये 1.3 लीटर मल्टीजेट इंजन लावण्यात आले आहे. त्यात 74 बीएचपी पॉवर आणि 190 एनमएचा टॉर्क जनरेट होतो. ही 25.2 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.
४- यात पुश स्टार्ट बटण, रिव्हर्स पार्किंग असिटंट, फ्रंट प्रोफाइल, प्रीमियम इंटेरियर आहे.
५- फ्रंट बोनेटवर काळ्या रंगाच्या दोन पट्ट्यांसह साइड स्किर्ट, नवीन बॉडी किट, अलॉय व्हिल, स्पोर्टियर फ्रंट बंपर आदी आहेत.
विशेष काय
या मॉडेलच्या केवळ 100 कार कंपनी विकणार आहे. त्यामुळे केवळ 100 भाग्यवंत ग्राहकांनाच त्या खरेदी करता येणार आहेत. 2005 मध्ये मारुतीने स्विफ्ट लॉंच केली होती. तेव्हापासून 12 लाख कार विकल्या गेल्या आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा, आणकी कोणते आकर्षक फिचर्स या कारमध्ये सादर करण्यात आले आहेत...