आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki To Recall 1,03311 Units Of Ertiga, Swift, DZire

अर्टिगा, स्विफ्ट, डिझायर रिकॉल करणार; फ्युएल फिलर नेकमध्ये दोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात सर्वात जास्त कार निर्मिती करणार्‍या मारुती सुझुकीने अर्टिगा, स्विफ्ट आणि डिझायर कार रिकॉल केल्या आहेत. या कारच्या फ्युएल फिलर नेकमध्ये दोष असल्याने 12 नोव्हेंबर 2013 आणि चार फेब्रुवारी 2014 या काळात निर्मित 1,03,311 कार परत मागवण्यात आल्या आहेत.

देशातील सर्वात मोठ्या कार रिकॉल ठरणार्‍या या मोहिमेबाबत मारुती-सुझुकीने सांगितले, या रिकॉलमध्ये 42,481 डिझायर, 41,237 स्विफ्ट आणि 13,593 अर्टिगा कार परत मागण्यात येणार आहेत. या तीन मॉडेलपुरताच हा रिकॉल असून मारुतीच्या इतर कार मॉडेलचा त्याच्याशी संबंध नसल्याचे मारुतीने स्पष्ट केले. रिकॉलची कारणेही कंपनीने स्पष्ट केली, त्यानुसार या कारच्या फ्युएल फिलर नेकमध्ये दोष आहे. त्यामुळे बहुतेक वेळा इंधनाचा वास येतो. तसेच ऑटो कट ऑफ पातळीच्या वर इंधन भरले, तर काही वेळा इंधनाची गळती होत असल्याचे आढळून आले आहे. ज्यांच्या कारमध्ये हा दोष आहे त्या कारधारकांना मारुती वितरक फोनद्वारे तशी माहिती देणार आहेत. त्या कारधारकांना हा भाग मोफत बदलून देण्यात येणार आहे. नव्याने बनवण्यात आलेले फ्युएल फिलर नेक वितरकांकडे पाठवण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले.

मारुतीची वेबसाइट पाहा : ज्यांच्याकडे 12 नोव्हेंबर 2013 नंतर घेतलेल्या अर्टिगा, डिझायर आणि स्विफ्ट कार आहेत, त्या ग्राहकांनी कंपनीचे संकेतस्थळ पाहावे व खात्री करून घ्यावी, असे आवाहन मारुती-सुझुकीतर्फे करण्यात आले आहे.
मारुतीचा सर्वात मोठा रिकॉल : यापूर्वी मारुतीने फेब्रुवारी 2010 मध्ये एक लाख ए-स्टार कार रिकॉल केल्या होत्या. इंधनाच्या पाइपमध्ये दोष असल्याने हा रिकॉल करण्यात आला होता. आता कंपनीने 1,03, 311 कार रिकॉल केल्या आहेत.