आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारुती एसएक्स-4 चे नवे मॉडेल सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठ्या कार निर्माती मारुती-सुझुकी कंपनीने शुक्रवारी एसएक्स-4 या कारचे नवे मॉडेल सादर केले. नव्याने सादर करण्यात आलेल्या या मध्यम आकाराच्या सेडान कारच्या किमतीत बदल करण्यात आला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. एसएक्स-4 ची किमत 7.38 लाख ते 9.79 लाख रुपये (एक्स शो-रूम) आहे.


नव्या एसएक्स- 4 बाबत कंपनीचे उपाध्यक्ष (मार्केटिंग) मनोहर भट यांनी सांगितले, नव्याने सादर करण्यात आलेल्या एसएक्स-4च्या सर्व मॉडेलमध्ये टच स्क्रीन ऑडिओ नेव्हिगेशन आणि इलेक्ट्रॉनिक फोल्डेबल ओआरव्हीएमसह टर्न इंडिकेटर आहेत. सुपर टर्बो 1.3 लिटर डिझेल आणि 1.6 लिटर व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन अशा दोन पर्यायासह एसएक्स-4 कार उपलब्ध आहे. नव्या कारच्या बाहेरील व आतील फीचर्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे.


पेट्रोल एसएक्स-4 कार 7.38 लाख ते 8.84 लाख रुपयांत उपलब्ध आहे. तर डिझेल एसएक्स-4 कारच्या किमती 8.27 लाख ते 9.79 लाख रुपयांदरम्यान आहेत. मारुतीने एसएक्स -4 कार सर्वप्रथम 2007 मध्ये बाजारात आणली. एसएक्स-4चे डिझेल मॉडेल 2011 मध्ये रस्त्यांवर आले. आतापर्यंत कंपनीने 1.08 लाख एसएक्स -4 कारची विक्री केली आहे.