आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती आणणार स्विफ्ट डिझायरचे नवे म़ॉडेल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीचे लोकप्रिय कार स्विफ्ट डिझायरचे नवे मॉड़ेल सादर करणार आहे. कंपनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे नवे मॉडेल सादर करेल. या नव्या कारचे वैशिष्टये हे आहे की, जुन्या मॉडेलपेक्षा हिचा आकार छोटा व आकर्षक आहे. तसेच ती नव्या प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध असेल.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक पारीख यांनी सांगितले की, या नव्या मॉ‍डेलसाठी भरपूर खर्च केला आहे. तसेच मागच्या कारच्या तुलनेत नवे १५० फीचर्स सामील केली आहेत. तसेच आकार छोटा केल्याने कंपनीला एक्साइज ड्यूटीत काही प्रमाणात सूट मिळेल. मात्र कंपनीने या नव्या कारची किंमत जाहीर केली नाही. सध्याच्या डिझायर कारच्या किमती श्रेणीनुसार ४.९४ लाख ते ७.२९ लाखाच्या दरम्यान आहेत. ही कार पेट्रोल व डिझेल या दोन्ही आवृत्तीत उपलब्ध असेल. या कारचे आणखी एक खास वैशिष्टये म्हणजे बिन गियरचे मॉडेल उपलब्ध असेल.
कंपनीने या कारच्या विकासासाठी २३० कोटी रुपये खर्च केले आ हेत. नव्या मॉडेलबाबत डिलर्सना माहिती देण्यात आली आहे.
पारीख म्हणाले, कंपनी जुने मॉडेल बंद करणार नाही. तिला मोठी मागणी आहे शिवाय ती यशस्वी व लोकप्रिय कार आहे. त्यामुळे कंपनी जुने आणि नवे दोन्ही मॉडेल उपलब्ध करेल. मात्र जुन्या गाडीतील टॉपचे व मधले मॉडेल बंद करेल.
स्विफ्ट डिझायर ही भारतात सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. भारतात या कारची आतापर्यंत ३ लाख २० हजार म़ॉडेल विकली गेली आहेत. या कारच्या खरेदीसाठी आजही बुकिंग तारखेपासून सहा महिन्यापेक्षा जास्त वेटिंग करावे लागत आहे.
आता ऑल्‍टो आणि मारुती 800 होणार इतिहासजमा
‘एट्रिगा’द्वारे मारुती करणार मल्टी युटिलिटी श्रेणीत एंट्री
मारुती-सुझुकीची झेप गुजरातमध्ये