आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Massive Oppourtunity For MSME In Solar Energy Business

नवी दिशा: कमी गुंतवणुकीत जास्त नफा, सुरु करा SOLAR ENERGY बिझनेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'सौर ऊर्जे'बाबत देशात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरु आहे. केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत सौर ऊर्जा निर्मितीवर अधिक भर दिला जात आहे. सौर ऊर्जेसाठी लागणारी प्लेट, बॅटरी, इंस्टालेशन, उपकरण, रिसर्च सारख्या गोष्टींची मागणी अलिकडच्या काळात वाढली आहे. यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिक संधी लक्षात घेऊन अनेक लघु उद्योजकांनी याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमावण्यासाठी अनेकांनी सौरऊर्जा प्रकल्पाशी संबंधित व्यवसाय सुरु केले आहेत.

विजेची कमतरता लक्षात घेता भविष्यात सौरऊर्जेची मदत घ्यावी लागणार आहे. देशात डब्ल्यूटीओनुसार 2022 पर्यंत 20,000 मेगावॅट वीज ही सौर ऊर्जेपासून निर्माण करण्याचे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत. याशिवाय घरच्या घरी सौर ऊर्चा प्रकल्प सुरु करून देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकतो. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी लागणारे अन्य उपकरणांची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एक लाख रुपये गुंतवून एक छोटा सोलर प्रोजेक्ट सुरु करून जास्त नफा मिळवता येऊ शकतो.

जवाहर लाल नेहरू सोलर राष्ट्रीय मिशननुसार एक मोठे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सन 2040 पर्यंत जगातील एकूण ऊर्जेच्या वापरात पाच टक्के सौर ऊर्जेचा समावेश असेल.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, सौर ऊर्जा व्यवसायातील फायदा...