आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mauritius To Provide Automatic Tax Information Exchange For

करविषयक माहितीसाठी मॉरिशस अवलंबणार स्वयंचलित मार्ग - पंतप्रधान रामगुलाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मनी लाँडरिंग’च्या कारवायांसाठी मॉरिशस मार्गाचा अवलंब करण्यात येत असल्याची टीका वारंवार करण्यात येते. परंतु याबाबतच्या संशयाचे वातावरण दूर करताना मॉरिशसचे मूळ भारतीय वंशाचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी भारताबरोबर करविषयक कोणत्याही माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी स्वयंचलित मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.
भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्लीला आलेल्या रामगुलाम यांनी कोणत्याही बेकायदा कारवायांसाठी आपल्या कार्यक्षेत्राचा वापर करण्यास मॉरिशस अजिबात परवानगी देणार नाही, असा निर्वाळाही दिला.
मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींना मॉरिशस भेटीचे आमंत्रण दिल्याचे सांगून रामगुलाम पुढे म्हणाले की, उभय देशांमध्ये थेट कर टाळण्याच्या कराराशी निगडित सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. या कराराबाबत अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता, विश्वासार्हता आणण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आम्ही उभयतांनी मान्य केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.