आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mcx Shares Gains At Sebi rbi Nod On Currency Options ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमसीएक्सच्या चलन व्यवहाराला परवानगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील सर्वात मोठा वायदेबाजार म्हणून ओळखल्या जाणा-या एमसीएक्स स्टॉक एक्सचेंजला 11 जुलैला समभाग व्यवहार करण्याची परवानगी बाजार नियंत्रक सेबीकडून मिळाली. आता या एक्सचेंजला सेबी आणि रिझर्व्ह बॅँक या दोन्ही नियामक संस्थांकडून चलन व्यवहार करण्याची परवानगी देखील मिळालेली आहे.
एमसीएक्स - एसएक्सने करन्सी डेरिव्हेटिव्हजच्या व्यवहारांसाठी सुविधा निर्माण केल्यानंतर जवळपास चार वर्षांनी सेबी आणि आरबीआयकडून ही परवानगी मिळाली आहे. सध्या एमसीएक्सकडून करन्सी डेरिव्हटिव्हज व्यवहारच करण्यात येतात. जुलै अखेर संपलेल्या कालावधीत एमसीएक्सने करन्सी डेरिव्हेटिव्हज विभागात 13 हजार 500 कोटी रुपयांच्या उलाढालीची नोंद केली. सध्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि युनायटेड स्टॉक एक्सचेंज (युएसई) या दोन अन्य एक्सचेंजकडून करन्सी डेरिव्हेटिव्हज व्यवहार देण्यात येतात. परंतु युनायटेड स्टॉक एक्सचेंजची उलाढाल घटली असून या एक्सचेंजमध्ये क्वचितच व्यवहार होतात. ही नियामक परवानगी मिळाल्यामुळे एमसीएक्स - एसएक्स ला आता करन्सी डेरिव्हेटिव्हजच्या व्यवहारांचा विस्तार करण्यास मदत होऊ शकणार आहे. करन्सी डेरिव्हेटिव्हज व्यवहार सुरू करण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून एमएसएक्सने मॉक ट्रेडिंग यशस्वीपणे पार पाडले. परंतु आता प्रत्यक्ष व्यवहारांची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.