आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAN CARD क्रमांकातच लपलेली असते कार्डधारकाची संपूर्ण माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पॅन कार्डला अधिकृत दस्ताऐवज मानले जाते. त्यामुळे प्रत्येक मोठ्या आर्थिक व्यवहारात पॅन कार्ड आवश्यक असते. प्राप्तीकर भरतानाही पॅन नंबर आवश्यक असतो. एवढेच नव्हे तर रेल्वेचे तत्काळ तिकीट काढतानाही आयडी प्रूफ म्हणून पॅन कार्ड देणे बंधनकारक करण्‍यात आले आहे.

'पर्मनंट अकाउंट नंबर', अर्थात पॅन नंबरमध्ये काय कोडींग लपले असते, या क्रमांकातील प्रत्येक डिजिटमध्ये विशिष्ट माहिती असते. पॅन कार्डवर एक 10 डिजिटचा क्रमांक असतो. तो कार्डवर लॅमिनेटेड रुपात असतो. प्राप्तकर विभागातर्फे हा अर्जदाराला दिला जातो. पॅक कार्ड बनल्यानंतर संबंधित व्यक्तीचे आर्थिक व्यवहार पॅन कार्डशी जोडले जातात. यात टॅक्स पेमेंटसह क्रेडिट कार्डच्या व्यवहाराची संपूर्ण आर्थिक व्यवहारावर प्राप्तकर विभागाचे लक्ष असते.

10 डिजिटच्या क्रमांकात तीन डिजिट इंग्रजीतील कॅपिटल अक्षरे असतात. त्यात AAA पासून ते ZZZ पर्यंत कोणतीही अक्षरे असू शकतात. प्राप्तकर विभागातर्फे या अक्षरांचा क्रम निर्धारित केला जातो.

पॅन कार्ड क्रमांकमधील चौथा डिजिट देखील इंग्रजीमधील एक अक्षर असते. हे अक्षर कार्डधारकाचे स्टेटस सांगते.
P- व्यक्ती
F- फर्म
C- कंपनी
A- AOP ( असोसिएशन ऑफ पर्सन)
T- ट्रस्ट
H- HUF (हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली)
B-BOI (बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल)
L- लोकल
J- आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन
G- गव्हर्नमेंट

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, अन्य डिजिट्सचा अर्थ...

टीप- छायाचित्रांचा वापर केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले होते.