आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mercedes Benz Handmade Engine Car News In Marathi

मर्सिडीझ बेंझची हँडमेड इंजिन कार 15 एप्रिलला येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लक्झरी कार निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारी मर्सिडीझ बेंझ कंपनी आता वन मॅन वन मशीन या संकल्पनेवर आधारित एएमजी श्रेणीतील चौथी कार जीएल 63 एएमजी पुढील आठवड्यात भारतीय बाजारात आणणार आहे. आतापर्यंत कंपनीने एएमजी श्रेणीतील जी-63, ई-63 आणि एसएलके-55 या कार भारतीय बाजारात आणल्या आहेत. जीएल 63 एएमजीची किंमत 1.5 कोटी ते 2.4 कोटी रुपयांदरम्यान राहील. जीएल 63 एएमजी जीएल क्लास एसयूव्हीवर आधारित आहे.

विशेष फीचर्स
- सात आसन 21 इंचांच्या अलॉय व्हीलसह
- स्पोर्टी लूक केबिन, एएमजी स्टेअरिंग व्हील, अ‍ॅक्टिव्ह कर्व्ह कंट्रोल या सुविधांमुळे चालकाचे जास्त नियंत्रण राहते.
- 2.5 टनांची जीएल-63 एएमजीला 5.5 लिटरच्या बायटर्बो व्ही 8 इंजिनाद्वारे ताकद मिळते. हे इंजिन 549 बीएचपीची शक्ती आणि 760 एनएमचा टॉर्क देते.
- 7 जी ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. चांगल्या रुंदीच्या व्हीलबेसमुळे कार केवळ 4.9 सेकंदांत 0 ते 100 किलोमीटरचा वेग घेते.
- कारचा कमाल वेग इलेक्ट्रॉनिक साधनांच्या साह्याने प्रतितास 250 किलोमीटरपर्यंत मर्यादित राखता येतो.

एएमजी इंजिन म्हणजे काय ?
मर्सिडीझच्या प्रत्येक श्रेणीच्या वाहनांसाठी एक एएमजी व्हर्जन असते. यात प्रारंभापासून ते शेवटपर्यंत इंजिननिर्मिती एकाच अभियंत्याकरवी करण्यात येते. एफ्रेच्ट, मेलचर आणि ग्रोबेपेच या तिघांनी 1960 मध्ये मर्सिडीझसाठी सर्वप्रथम स्पोटर्स इंजिन तयार केले होते. त्यांच्या आद्याक्षरांवरूनच एएमजी हे नाव देण्यात आले. कंपनी स्पोटर््स रेसिंग क्षेत्रातून जवळपास हद्दपार झाली होती. त्याच वेळी या तिघांनी बनवलेल्या इंजिनमुळे कंपनीने जर्मन टुरिंग कार चॅम्पियनशिप जिंकली होती. या यशानंतर 1971 मध्ये प्रत्येक श्रेणीत एएमजी मॉडेल असते.