आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mercedes Benz Will Introduced New Cheap Car In India

मर्सिडीजची सर्वात स्‍वस्‍त कार येणार जुलैमध्‍ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतातील लक्‍जरी कारमधील घटत चाललेला हिश्‍यामुळे चिंतेत असलेल्‍या मर्सिडीज बेंजने जुलै अखेरपर्यंत आपली सर्वात स्‍वस्‍त कार मर्सिडीज ए क्‍लास सादर करण्‍याची घोषणा केली आहे.

कंपनीचे नवे मुख्‍य कार्यकारी अधिकारी इबेहार्ड केर्न यांनी मर्सिडीजच्‍या देशातील सर्वात मोठ्या शोरूमचे दिल्‍लीमध्‍ये उद्‍घाटन करताना ही माहिती दिली.


मर्सिडीज बेंजच्‍या ए क्‍लास कारची किंमत 20 लाख रूपयांच्‍या आसपास असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. कंपनी कार विक्रीच्‍या आकडेवारीकडे लक्ष देत नाही. अजूनही लक्‍जरी स्‍पोर्ट युटिलिटी वाहन श्रेणीमध्‍ये कंपनी एसयुव्‍हीमध्‍ये अव्‍वल नंबरवर असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

वर्ष 2012 मध्‍ये मर्सिडीजने देशात 7138 कार विकल्‍या होत्‍या. अमेरिकेनंतर भारत कंपनीसाठी दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पुण्‍यातील चाकण जवळ कंपनीचा 850 कोटींचा ए क्‍लास एसयुव्‍ही कार निर्मितीचा प्रकल्‍प उभा करत आहे.