आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२३ हजारांचा एमआय नोट देणार ६२ हजारांच्या आयफोन ६ प्लसला टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : मिट्ट काळोखातही दिवसाप्रमाणे छायाचित्रांचा दर्जा
बीजिंग - शाओमीने आपल्या अद्ययावत एमआय या स्मार्टफोनवरचा पडदा हटवला आहे. बीजिंगमध्ये हा हँडसेट सादर करण्यात आला. शाओमीचा हा स्मार्टफोन यंदाच्या सर्वात मोठ्या लाँचिंगपैकी एक आहे. कंपनीच्या मते, आतापर्यंत आलेल्या सर्व स्मार्टफोनपैकी हा सर्वात विशेष आहे. अॅपलच्या आयफोन-६ प्लसचा कमी किमतीतला स्पर्धक बनण्याची क्षमता यात असल्याचे जाणकारांचे मत आहे.

एमआय नोट उत्तम डिस्प्ले दर्जा
हँडसेटची स्क्रीन ५.७ इंच असून आयफोन-६ च्या (५.५ इंच स्क्रीन) तुलनेत ती मोठी आहे. फुल एचडी स्क्रीन आणि ३८६ पिक्सल प्रति इंच घनता आहे. त्यामुळे डिस्प्लेचा दर्जा उत्तम राहतो. कंपनीच्या मते, यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चे संरक्षण आहे. भारतात लवकरच उपलब्ध होईल.